22 November 2024 3:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

ऑलिम्पिक स्पर्धा असतानाही स्पोर्ट्स बेजट 230 कोटींनी घटवला | पण ऑलिम्पिकवरून स्वतःचा जोरदार PR - सविस्तर

The Central government in the Union budget for 2021-22 sports budget less by rupees 230 crore news updates

मुंबई, ०६ ऑगस्ट | टोकियो ऑलिम्पिक सुरु झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःचा जोरदार पीआर सुरु केल्याची चर्चा आता समाज माध्यमांवर रंगू लागली आहे. विशेष म्हणजे २०२१ मधील केंद्रीय बजेटमध्ये मोदी सरकारने यावर्षी ऑलिम्पिक स्पर्धा असतानाही तब्बल 230 कोटी 78 लाख रुपयांची म्हणजे स्पोर्ट्स वार्षिक बजेट रक्कम तब्बल 8.16 टक्क्यांनी घटवली आहे. त्यावरून खेळ आणि ऑलिम्पिक स्पर्धा याविषयावर किती गंभीर आहेत याचा प्रत्यय येतो. मात्र स्पर्धा सुरु झाल्यापासून त्यांनी स्वतःच्या संवादाचे व्हिडिओ कंटेंट प्रसार माध्यमांकडे पोहोचवून स्वतःचा जोरदार PR केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

संसदेच्या चर्चेत सहभागी न होणारे मोदी कार्यालयीत खेळाडूंच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये व्यस्त असल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळतंय. मुळात तो ऑडिओ काल असताना मोदींच्या कार्यालयातील आणि टोकियोतील स्पर्धकांमध्ये एक टीम याच PR साठी काम करत असल्याचं म्हटलं जातंय. अगदी आजच उदाहरण म्हणजे मोदींनी भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूंशी फोनवरुन बातचित केली. पंतप्रधानांचे कौतुकाचे बोल ऐकून महिला हॉकीपटूंचे डोळे पाणावले. पंतप्रधानांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या खिलाडू वृत्तीची तारीफ केली. फोनवरील संवादावेळी महिला हॉकीपटूंचे भाव कॅमेरात कैद झाले आहेत. आणि तेच कन्टेन्ट माध्यमांमध्ये पोहोचविण्यात येत आहेत.

पंतप्रधानांची महिला हॉकी संघासोबतची बातचित वाचा

मोदी: तुम्ही सगळे खूप छान खेळलात. तुम्ही गेली 5-6 वर्षे खूप घाम गाळला, सर्व काही मागे टाकून तुम्ही ही साधना करत होता. तुमचा घाम पदक आणू शकला नाही, पण तुमचा घाम देशाच्या कोट्यवधी मुलींचा घाम बनला आहे. मी तुमचा संघ आणि तुमच्या प्रशिक्षकाचे अभिनंदन करतो. अजिबात निराश होऊ नका.

टीम : तुम्ही आम्हाला एवढे प्रोत्साहन दिले यासाठी धन्यवाद.
मोदी: मी पाहत होतो की, नवनीतच्या डोळ्यांना काही दुखापत झाली आहे. आता ठीक आहे ना. तिच्या डोळ्याला नुकसान तर पोहोचले नाही ना.
टीम : हो सर तिला 4 टाके पडले आहेत, आता सर्व ठिक आहे.

मोदी: वंदना आणि सर्वांनी उत्तम काम केले. सलीमाने तर… प्रत्येकाला वाटले की सलीमाने एक अद्भुत काम केले आहे. तुम्ही रडणे थांबवा. आवाज माझ्याकडे येत आहे. देशाला तुझा अभिमान आहे. अजिबात निराश होऊ नका. इतक्या दशकांनंतर हॉकी भारताची ओळख पुन्हा जिवंत होत आहे, ती तुमच्या मेहनतीमुळे.

मोदी: मी पाहिले आहे की तुमच्या प्रशिक्षकानेही त्यांचे सर्वोत्तम दिले आहे. तुम्ही मुलींना कसे प्रोत्साहन देत होता हे मी पाहत होतो. मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा.

प्रशिक्षक: धन्यवाद सर. मुली सध्या खूप भावनिक आहेत. मी त्यांना सांगत आहे की त्यांनी देशाला प्रेरणा दिली आहे. त्यांनी एक उत्तम काम केले आहे आणि त्यांनी ते साजरे केले पाहिजे. तुमच्या समर्थनाबद्दल धन्यवाद सर.

मोदी : थँक यू, थँक यू.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: The Central government in the Union budget for 2021-22 sports budget less by rupees 230 crore news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x