28 November 2024 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Railway Ticket Booking | ही एक ट्रिक वापरा आणि वृद्ध आई-वडिलांसाठी कन्फर्म लोअर सीट बुक करा, प्रवास सुखकर होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, मजबूत कमाईची संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या पार, स्टॉक सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल सह टार्गेट नोट करा - NSE: YESBANK Surya Rashi Parivartan | सूर्य राशी परिवर्तनामुळे 'या' राशींचं नशीब उघडणार; कामाचा व्याप संपून पैसे येण्याचा मार्ग मोकळा होणार Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट स्पीडमध्ये, 5 दिवसात 25% परतावा दिला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA Kotak Bank Salary Account | 99% सरकारी कर्मचाऱ्यांना 'या' योजनेची माहिती नाही, सॅलरी अकाउंटवर स्पेशल ऑफर - Marathi News
x

स्त्री-पुरुष समानतेच्या पुरस्कर्त्या ताराबाई शिंदे | सर्व स्त्रियांसाठी एक प्रेरणास्थान

Tarabai Shinde information in Marathi

मुंबई , ०७ ऑगस्ट | स्त्री आणि तिच्या विवंचना हेच तिचे जग नसून या पलीकडे सुद्धा तिचे अस्तित्व आहे आणि ह्याची जाणीव तिला झाली पाहिजे या आकांताने स्त्री- पुरुष समानतेच्या पुरस्कर्त्या ताराबाई शिंदे या सर्व स्त्रियांसाठी एक प्रेरणास्थान आहेत.

ताराबाई शिंदे यांचा जन्म १८५० रोजी झाला. त्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका आणि सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या. त्या मूळच्या बुलढाणाच्या होत्या. ताराबाईंच्या घरी सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानता होती. शिक्षणाने त्यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. स्त्री असूनही त्या काळात त्या घोडा चालवायला शिकल्या होत्या. त्या स्वभावाने तापट होत्या. त्यांचे लग्न एक सर्वसामान्य मुलाबरोबर झाले. स्त्रियांमध्ये जसे दुर्गुण असतात तसे ते पुरुषांमध्ये सुद्धा काठोकाठ भरलेले असतात असे सांगण्याचे धाडस त्यांनी १९व्या शतकाच्या उत्तरार्धात केले.

त्यांचे स्त्रीपुरुष तुलना हे पुस्तक प्रचंड गाजले. त्यांनी या पुस्तकात विधवा विवाहास उच्चवर्णीयांकडून केलेली मनाई, तिचे हाल आणि शिक्षण नसल्याने तिची होणारी कुचंबणा याचे वर्णन केले आहे. परंपरेने स्त्रीला दिले जाणारे दुय्यम स्थान, पुरुषला दिले जाणारे अतिरिक्त महत्व हे त्यांना पटत नव्हते. त्यांनी दिलेला स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणारा होता.

ताराबाईंचे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि ते पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा ठरली ती ‘विजयालक्ष्मी केस. ’सुरत येथील विजयालक्ष्मी या ब्राह्मण कुटुंबातील तरुण विधवेने व्यभिचार करून गर्भपात केला. त्याबद्दल सुरत न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली. पुढे मुंबई उच्च न्यायालयात अपील केल्यावर ही शिक्षा पाच वर्षांच्या सक्तमजुरीत बदलण्यात आली. या खटल्याला तेव्हा प्रचंड प्रसिद्धी मिळाली. वृत्तपत्रांतून त्याविषयी अनुकूल-प्रतिकूल मते व्यक्त होत होती. त्यातून स्त्रीजातीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होत होता. हा खटला आणि त्या अनुषंगाने ‘पुणेवैभव’सारख्या सनातनी वृत्तपत्रांनी स्त्रीजातीवर उडवलेली टीकेची झोड यांमुळे ताराबाई अस्वस्थ झाल्या, आणि त्यांनी हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी रोखठोक शब्दांत स्त्रियांची कैफियत मांडली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Story Title: Tarabai Shinde information in Marathi story updates.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x