29 April 2025 12:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

पॉर्नोग्राफी प्रकरण | शर्लिन चोप्राच्या ८ तास चौकशीनंतर राज कुंद्रा अधिकच अडचणीत

Raj Kundra

मुंबई, ०७ ऑगस्ट | पोर्नोग्राफी प्रकरणी क्राइम ब्रांचच्या विशेष पथगकाने मॉडेल शर्लीन चोप्राची 8 तास चौकशी केली. शर्लीन चौकशीसाठी क्राइम ब्रांचमध्ये शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास पोहोचली होती. त्यानंतर रात्री 8 वाजता ती कार्यालयातून बाहेर पडली. या दरम्यान तिने राज कुंद्रा आणि पोर्नोग्राफी संदर्भात अनेक खुलासे केले आहेत. तिने राजच्या विरोधात काही गंभीर आरोप सुद्धा केले आहेत.

सध्या तुरुंगात असलेल्या राज कुंद्राच्या ‘आर्म्सप्राइम मीडिया’ या कंपनीसोबत शर्लीनचा करार होता. या कराराची एक प्रत घेऊनच शर्लीन चौकशीसाठी हजर झाली होती. क्राइम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेल विभागाने कलम 160 नुसार तिला समन्स बजावले होते. बाहेर पडताच तिने माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 8 तास झालेल्या चौकशीमध्ये ‘आर्म्सप्राइम मीडिया’ कंपनीसोबत असलेल्या कराराबद्दल विचारणा झाली. यासोबतच कुंद्राशी कसे संबंध होते? त्याच्या इतर कंपन्यांबद्दल काय माहिती आहे? असे प्रश्न विचारण्यात आल्याचे शर्लीनने सांगितले.

राज कुंद्रानेच पोर्न बिझनेसमध्ये आणल्याचा आरोप:
शर्लीनने राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले. त्यानुसार, राज कुंद्रामुळेच ती पोर्न बिझनेसमध्ये गेली. राजनेच तिला अश्लील कंटेन्टवर काम करण्यास सांगितले होते. सुरुवातीला त्याने एक भूमिका ऑफर केली होती. त्यानंतर अश्लील कंटेन्ट बनवण्यास सांगितले. राजनेच आपल्याला हॉटशॉट अ‍ॅपवर शूट करण्यासाठी सांगितले होते. परंतु, आपण नकार दिला असे शर्लीनने सांगितले.

शर्लीनचा दावा, कुंद्रा-शिल्पाचे संबंध गुंतागुंतीचे:
शर्लीनने सांगितल्याप्रमाणे, राज कुंद्रा 27 मार्च 2019 रोजी तिच्या घरात आला होता. त्यावेळी त्याने आपल्यासोबत बळजबरी संबंध बनवण्याचा प्रयत्न केला. ती कुंद्राला विरोध करत होती. “मला वैयक्तिक आयुष्य आणि बिझनेस वेगळेच ठेवायचे होते. सोबतच, एका विवाहित पुरुषासोबत मला संबंध ठेवायचे नव्हते. पण, तोच म्हणाला, की मी शिल्पा शेट्टीसोबतच्या नात्यात सुखी नाही. शिल्पासोबत राहून मी नेहमीच तणावात असतो असे त्याने मला सांगितले होते.”

हायकोर्टाने जमीन फेटाळला:
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत अटकेला आव्हान देणारी याचिका राज कुंद्राने दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. राज कुंद्रासह त्याच्या कंपनीतील आय.टी. प्रमुख रायन थॉर्पचीही अटक योग्यच आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Total Eight hour investigation of Model Sherlyn Chopra in pornography case news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या