22 November 2024 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Parenting | पालकांनो मुलांना चांगल्या सवयी लावायच्या आहेत? | मग आधी स्वतःमध्ये हे बदल करा - नक्की वाचा

Parenting

मुंबई ०८ ऑगस्ट | मुलांचे संगोपन करणे हे कोणत्याही पालकांसाठी जबाबदारीचे काम असते कारण आपण अनेक वाया गेलेली मुले पाहतो आणि त्यांच्या गैरवर्तनामागचे कारण हे पालकांचे दुर्लक्ष हेच असते. यासाठी पालकांनी मुलांवर शक्य तितके लक्ष देऊन त्यांना चांगले संस्कार आणि शिकवण द्यायलाच हवी. मुले प्रत्येक गोष्ट ही आपल्या आई वडिलांकडूनच शिकतात. त्यामुळे आई वडिलांनी सुद्धा आपल्या सवयींचे मूल्यमापन केले पाहिजे. आपल्या कोणत्या सवयी चांगल्या आहेत कोणत्या सवयी वाईट आहेत याचे परीक्षण करून वाईट सवयींपासून दूर राहायला हवे.

जर पालकांनाच वाईट सवयी असतील तर मुल त्या सवयी लवकर शिकून स्वत: देखील तसंच वागू शकतात. आपले आई वडील करतात तर आपण केलं तर काय वाईट ही भावना त्यांच्या मनात उत्पन्न होते. हे टाळायचे असेल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे कारण या लेखात आम्ही अशा काही सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या पालकांनी टाळायला हव्यात.

खूप टिव्ही पाहणे:
टीव्ही पाहणे ही वाईट सवय नक्कीच नाही. मनोरंजनाचे माध्यम घरात असायलाच हवे. पण खूप जास्त टीव्ही पाहणे अत्यंत वाईट गोष्ट आहे. सतत दिवसभर टीव्ही पाहणे हे शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या घातक ठरू शकते. जेव्हा मुले आपल्या पालकांनाच दिवसभर टीव्ही पाहताना बघतात तेव्हा असे करणे योग्य आहे असे त्यांना वाटू शकते आणि मुलांना देखील दिवसभर टीव्ही पाहण्याची सवय लागू शकते. हीच गोष्ट टाळण्यासाठी सर्वप्रथम पालकांनी स्वत: कमीत कमी टीव्ही पाहावा, जेणेकरून एक चांगली सवय मुले शिकू शकतात.

ओरडणे आणि भांडणे:
काही पालकांचा रागाचा पारा खूप असतो आणि त्यांच्यात जोरजोरात ओरडण्याची आणि भांडण्याची एक सवय निर्माण होते. लहान सहान गोष्टींवर सुद्धा काही आई किंवा वडील खूप आकांडतांडव करतात. कधी कधी आपल्याच मुलावर सुद्धा राग काढतात. मुले एक सवय म्हणून ही गोष्ट आत्मसात करत नसले तरी यामुळे त्यांच्या मनात आपल्या पालकांविषयी चुकीचे मत निर्माण होऊ शकते. या अशा ओरडण्याने, अपमानित भावनेमुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण होऊ शकते. अशी सवय असणाऱ्या पालकांनी ही सवय लवकरात लवकर सोडून द्यावी आणि मुलांशी प्रेमाने वागावे.

दुसऱ्यांशी तुलना करणे:
अनेक पालकांना आपल्या मुलाने कितीही चांगली गोष्ट केली तरी त्याचे कौतुक नसते. याउलट ते आजूबाजूच्या किंवा नात्यातील कोणत्या तरी समवयीन मुलाचे उदाहरण देतात आणि आपल्या मुलाशी त्या मुलाशी तुलना करतात. ही सवय अत्यंत घातक असून मुलावर गंभीर मानसिक परिणाम करू शकते. यामुळे मुलाच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. स्वत:च्याच पालकांबद्दल राग उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे मुलांचे नेहमी कौतुक करावे, त्यांना प्रोत्साहित करावे. अपयश आल्यास त्यांना धीर द्यावा.

मारझोड:
जगात अनेक देशांत लहान मुलांसाठी कायदे आहेत. ज्या अंतर्गत पालक आपल्या मुलाला बेदम मारहाण करू शकत नाहीत. पण आपल्या देशात असा कोणताही नियम व कायदा नाही. उलट आपल्याकडे असे समजले जाते की मुलाला मारल्या शिवाय त्याला शिस्त लागणार नाही आणि ही मानसिकता एवढी जनमानसात रुजली आहे की मुलांना शिस्त लावण्याच्या नावाखाली खूप मारझोड केली जाते. असे करणाऱ्या पालकांना त्यांचे परिणाम काहीच काळात भोगावे लागतात कारण अशी मारहाण केल्याने ते मुल सुद्धा तितकेच रागीट आणि क्रोधीत तर होतेच शिवाय वाममार्गाला सुद्धा लागू शकते. काही मुले तर घाबरून वा कंटाळून आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचतात. मुलांना मारहाण केल्याने मुल नियंत्रणात राहण्याऐवजी हाताबाहेर जाऊ शकते. त्याममुळे मुलांशी प्रेमाने वागण्याचीच सवय लावून घ्या.

गॉसिप करणे:
खास करून आई वर्गाला ही सवय असते. इतर स्त्रियांबद्दल किंवा लोकांबद्दल गॉसिप करणे अशा गोष्टी मुलांसमोर केल्याने मुलं ती सवय सहज आत्मसात करू शकतात आणि त्या प्रमाणे वागायला लागू शकतात. त्यांना वाटते की आपली आई करते आहे तर आपण का नाही करू शकत? आणि याचा परिणाम असा होतो की आपल्या मित्रमैत्रीणींबद्दल व अन्य मोठ्या व्यक्तीबद्दल गॉसिप करण्यास मुल सुरुवात करते. अशी मुळे आगाऊ वा उद्धट म्हणूनही लोकांच्या नजरेत येतात. त्यामुळे तुमच्या मुलाशी अशी प्रतिमा निर्माण होऊ नये असे वाटत असेल तर ही सवय सुद्धा बदला.

मुलांना समानता शिकवा:
मुलांची वेगळी कामे, मुलींची वेगळी कामे असे काही नसते हे मुलांना योग्य वेळी समजावले पाहिजे. हे समजवायला काही त्यांना आपल्या समोर बसून, बोलून त्यांना काही सांगून उपयोग नसतो तर त्यांना ते आपल्या कृतीतून समजले पाहिजे. सगळी कामे मुलांना आणि मुलींना आलीच पाहिजेत आणि येत नसतील तर त्यांनी ती शिकून घ्यायला हवीत.

कोणताही काम न लाजता करायला हवीत हे मुलांना शिकवण्याचा एक सोपा मार्ग आहे. कोणता?
तर घरात आईने करायची अमुक कामे आणि बाबांनी करायची अमुक कामे असे वर्गीकरण न ठेवणे. मुलांनी जर लहानपणापासून आईबाबांना आलटून पालटून कधी घरातली तर कधी बाहेरची कामे करताना बघितले तर त्यांना स्वतःला कोणतेच काम करायला लाज वाटणार नाही. याहीपेक्षा पुढे जाऊन, आईबाबांनी मुलं लहान असतानाच त्यांना त्यांच्या वयानुसार घरच्या आणि बाहेरच्या कामांची त्यांना झेपेल इतकी जबाबदारी दिली पाहिजे. मात्र एकदा जबाबदारी दिली की ते काम पूर्णपणे त्यांच्यावर सोपवायला हवे. त्यात त्यांना सूचना, सल्ले देऊन ढवळाढवळ करू नये. कदाचित त्यांच्याकडून ते काम आपल्याला हवे तसे होणार नाही, काही चुका होतील. पण त्या होऊ द्याव्यात कारण आपण सांगून शिकवण्यापेक्षा स्वतः केलेल्या चुकांमधून मुलं जास्त चांगल्या पद्धतीने शिकतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Parenting Title: Parents should avoid these bad habits for betterment of child information in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Parenting(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x