25 November 2024 9:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Health First | मेंदूच लावतो आपल्याला चांगल्या किंवा वाईट सवयी? | काय आहे सत्य? - नक्की वाचा

Health First

मुंबई ०८ ऑगस्ट | कोणतीही चांगली अथवा वाईट सवय लागणे हे मेंदूत ठरत असते. वाईट सवयींना आपण व्यसन म्हणू शकतो. यासाठी काही टप्पे असतात. सर्वांत प्रथम एखाद्या समाधानाचा किंवा बक्षिसाचा मोह यामुळे मनात किंवा विचारात स्वयंसूचना निर्माण करतो. मेंदूला ती स्वयंसूचना मिळते आणि आपल्या वर्तनाला प्रेरित करणारे संदेश मेंदूतून जाऊ लागतात. नंतर अमुक एक केले, तर मला तमुक गोष्ट मिळेल आणि समाधान किंवा आनंद मिळेल या सूचनेचे रूपांतर मग ती गोष्ट केलीच पाहिजे या विचारात आणि त्यासंबंधीच्या वर्तनात होते.

नियंत्रणा पलीकडची एक तीव्र प्रेरणा:
नियंत्रणा पलीकडची ही एक तीव्र प्रेरणा असते. तिला अनुसरून मेंदू तसे वर्तन करण्याची आज्ञा देतो आणि त्यानुसार आपण ती गोष्ट करतो. यामागे ते समाधान मिळवण्याची ओढ असते. सूचना मिळाल्यावर ओढ निर्माण होते आणि त्या तीव्र इच्छेतून आपण जे वागतो किंवा जो विचार करतो ती गोष्ट. म्हणजेच सवय किंवा व्यसन म्हणतात.

या वर्तनाला जेवढे जास्त अडथळे असतील किंवा प्रखर विरोध असेल तेवढी ती गोष्ट घडण्याची शक्यता कमी असते. कोणत्याही सवयीच्या किंवा व्यसनाच्या चक्रातला हा अंतिम टप्पा असतो. स्वयंसूचना ही समाधान जाणून घेणारी यंत्रणा असते. ते समाधान मिळण्यासाठी होणारी तगमग ही ओढ असते. ते समाधान मिळवण्यासाठी केलेली हालचाल आणि धडपड म्हणजे प्रतिसाद असतो. यातून जे फलित मिळते त्यातून समाधान आणि आनंद तर मिळतोच, पण काही शिकवण देऊन जाते.

कुठल्याही समाधानाचे मुख्य काम तुमची तीव्र ओढ:
कुठल्याही समाधानाचे मुख्य काम तुमची तीव्र ओढ तृप्त करणे. अन्नपाण्याची ओढ आपली भूक भागवते, शरीराला उर्जा देते, कामातील बढती आपल्याला जास्त आर्थिक प्राप्ती देते, स्टेट्स वाढवते. समाधानातून आणखी एक गोष्ट मिळते, ती म्हणजे मेंदूमध्ये त्या समाधानाचा एक ठसा उमटतो, एक सुखद स्मृती बनते. मानसशास्त्राच्या संशोधनात एखादी गोष्ट आपण वीस किंवा त्यापेक्षा जास्त वेळा केली, तर त्याची आपल्याला सवय होऊन जाते. एखादे नवे वागणे जेव्हा सतत होते, तेव्हा त्याला सवय म्हणतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: How the brain instill good or bad habits in human information in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x