22 November 2024 8:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

तुमच्या व्हाट्सअँपवर काही सेकंदात मिळवा कोरोना लसीकरण प्रमाणपत्र | या स्टेप्स फॉलो करा

Corona vaccine certificate on Whatsapp

मुंबई ०९ ऑगस्ट | देशातील नागरिकांना आता कोरोनाची लस घेतल्यानंतर काही सेकंदातच लस घेतल्याचे प्रमाणपत्र व्हॉट्सअ‌ॅपद्वारे मिळणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या कार्यालयाने रविवारी याबाबतची माहिती दिली. सध्या, नागरिक कोविन पोर्टलवर लॉगइन केल्यानंतर त्यांचे कोरोना लस प्रमाणपत्र डाऊनलोड करत आहेत.

व्हॉट्सअपद्वारे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय करावे लागणार?

MyGov Corona Helpdesk द्वारे तीन टप्प्यात आता हे कोरोना लस प्रमाणपत्र व्हॉट्सअपद्वारे नागरिकांना काही सेकंदातच उपलब्ध होणार आहे.

१. +91 9013151515 हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करणे.
२. यानंतर covid certificate असे टाईप करून या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे मेसेज करणे.
३. त्यानंतर आलेल्या ओटीपी एंटर करणे. यानंतर काही सेंकदातच कोरोना लस प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे, असे मंडविया यांच्या कार्यालयाने ट्विट केले.

दरम्यान, कोरोना व्यवस्थापनावरुन सरकारवर नेहमी हल्ला करणारे, ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले. ते म्हणाले, जेव्हा सरकारने चांगले कार्य केले तेव्हा मी नेहमीच त्यांची प्रशंसा केली आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय नक्कीच प्रशंसनीय आहे, असे ट्विट त्यांनी केले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to get corona vaccine certificate on Whatsapp in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x