3 December 2024 10:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

भाजपला मिळणाऱ्या निवडणूक निधीचा आकडा एखाद्या उद्योग समुहासारख्या वार्षिक उलाढालीप्रमाणे - सविस्तर वृत्त

Election Commission

नवी दिल्ली, १० ऑगस्ट | मागील वर्षी भारतीय जनता पक्षाने इलेक्टोरल बाँडच्या (रोखे) माध्यमातून जवळपास ७५ टक्के देणगी मिळवली असून मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसला मात्र फक्त नऊ टक्केच देणगी मिळवण्यात यश आलं. भारतीय निवडणूक आयोगाकडून ही माहिती मिळाली आहे. ३ वर्षांपूर्वी इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देणगी मिळवण्याची योजना आणण्यात आली होती. यामध्ये देणगीदाराची ओळख जाहीर होत नसल्याने याचा वापर वाढला आहे.

भारतीय जनता पक्षाबद्दल बोलायचं गेल्यास इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून मिळणाऱ्या स्वैच्छिक योगदानाचा वाटा २०१७-१८ मधील २१ टक्क्यांवरून २०१९-२० मघ्ये ७४ टक्क्यांवर गेला आहे. बाँडच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला मिळणाऱ्या देणगीत खूप मोठी वाढ झाली आहे. २०१७-१८ मध्ये भारतीय जनता पक्षाला २०१७-१८ मध्ये स्वैच्छिक योगदान म्हणून मिळालेल्या एकूण ९८९ कोटींपैकी २१० कोटी रुपये आणि २०१९-२० मध्ये ३४२७ कोटींपैकी २५५५ कोटी बॉण्डमधून मिळाले.

दुसरीकडे काँग्रेसला २०१८-१९ मध्ये बाँडच्या माध्यमातून ३८३ कोटी मिळाले होते. २०१९-२० मध्ये काँग्रेसला मिळालेल्या ४६९ पैकी ३१८ कोटी बाँडमधून मिळाले असून एकूण देणगीच्या ६८ टक्के आहेत.

राज्यस्तरीय पक्षांची स्थिती:
याशिवाय २०१९-२० मध्ये बाँडच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २९ कोटी २५ लाख, तृणमूल काँग्रेसला १०० कोटी ४६ लाख, डीएमकेला ४५ कोटी, शिवसेनेला ४१ कोटी, राष्ट्रीय जनता दलाला २.५ कोटी आणि आम आदमी पक्षाला १८ कोटी मिळाले आहेत.

७३ कोटींची जमीन खरेदी:
भाजपा देशातील सर्वात श्रीमंत पक्षा राहिला आहे. भाजपाकडे एकूण ३५०१ कोटी आहेत. २०१९-२० च्या तुलनेत भाजपाच्या संपत्तीत १९०४ कोटींची वाढ झाली आहे. भाजपाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीनुसार, पक्षाने ७३ कोटींची जमीन खरेदी केली असून ५९ कोटींच्या इमारती खरेदी केल्या आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title:  BJP is richest party in getting election party huge fund news updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x