23 November 2024 6:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

रायगड | रोहा येथे दुर्मीळ उडता सोनसर्प आढळला | सर्पमित्रांमध्ये आनंद

Chrysopelea ornata flying snake

रायगड, १० ऑगस्ट | जिल्ह्यातील रोहा येथे दुर्मीळ उडता सोनसर्प आढळून आला आहे. जिल्ह्यात प्रथमतःच आढळून आलेल्या या सापामुळे सर्पमित्रांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. या सापाबाबत अधिक अभ्यास करून, अशा दुर्मीळ सापांना संरक्षण देण्यात यावे, अशी सर्पमित्रांनी यावेळी मागणी केली आहे.

सर्पमित्रांमध्ये व्यक्त केला जातोय:
आनंद -रोहा तालुक्यातील डोंगरी येथे राहणाऱ्या अमोल देशमुख यांच्या घराजवळ असलेल्या शेडमध्ये साप दिसून आल्याने त्यांनी सर्पमित्रांना बोलावले होते. यावेळी रोहा येथील सर्पमित्रांना परिसरात आढळणाऱ्या प्रजाती व्यतिरिक्त नवीन प्रजातीचा साप असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी या सापाची सुटका करून सहकारी मित्रांकडून अधिक माहिती घेतली असता तो उडता सोनसर्प असल्याचे निदर्शनास आले. या सापाला इंग्रजीत ऑरनेट फ्लाईंग स्नेक असे म्हणतात. हा साप महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर आणि आंबोली घाटात काही प्रमाणात आढळून येतो. मात्र, हा साप या ठिकाणी कसा आला याबाबत सर्पमित्रांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. उडता सोनसर्प आपल्या विभागात मिळाल्याने सर्पमित्रांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

वन विभागामार्फत पंचनामा:
सापाची माहिती मिळताच उरण येथील वन्यजीव निसर्ग संवर्धन संस्थेच्या सदस्यांनी रोहा येथे जाऊन या दुर्मीळ सापाची पाहणी केली. या सापाची लांबी ही सुमारे २ फूट ५ उंच असून तो निमविषारी प्रवर्गातील असल्याचे सांगण्यात आले. तर रोहा येथील वनविभागामार्फत या दुर्मीळ सापाचा पंचनामा करण्यात आला असून त्याला कोंबर परिसरात सुरक्षित सोडण्यात आले. तर, रायगड जिल्ह्यात प्रथमतःच दिसून आलेल्या या दुर्मिळ प्रजातीमुळे सर्पमित्रांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Rare Chrysopelea ornata flying snake found in Raigad news updates.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x