24 November 2024 7:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

ओबीसी नेते राम शिंदेंना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद देण्याची मागणी पुढे | फडणवीस काय करणार?

BJP Maharashtra

कर्जत-जामखेड, ११ ऑगस्ट | भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेत आता अहमदनगर जिल्ह्यातयून आणखी एक नाव पुढे आले आहे. नगर जिल्ह्यातील भाजप नेते राम शिंदे यांचे नाव त्यांच्या समर्थकांमधून पुढे करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि ओबीसी समाजाचे नेते, मंत्री असताना अनेक खाती सांभाळण्याचा अनुभव, पक्षात विविध पदांवर कामाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांनाच हे पद मिळावे, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांडून व्यक्त केली जात आहे राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी गेल्या निवडणुकीत शिंदे यांचा पराभव केला.

त्यानंतर शिंदे यांचे पक्षाकडून पुनर्वसन केले जाईल, अशी अपेक्षा समर्थकांना होती. अलीकडेच त्यांना पक्ष संघटनेत पहिल्यापेक्षा मोठी जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांना हे पद मिळाले नव्हते. आता ओबीसी चेहरा देण्याची पक्षाची भूमिका असल्याने शिंदे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

शिंदे यांची बलस्थानेही सांगितली जाऊ लागली आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातून शिंदे आमदार होते. युतीच्या सरकारमध्ये ते मंत्री झाले. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळेच त्यांच्या मंत्रिमंडळात शिंदे यांच्याकडे तब्बल चौदा खाती होती.

त्या सरकारमध्ये सर्वांत जास्त खाती मिळालेले ते एकमेव मंत्री होते. आता प्रदेशाध्यक्षच बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याने थेट या पदासाठीच त्यांच्या समर्थकांकडून दावा सांगितला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे पूर्वी या पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Nagar BJP demanded to make Ram Shinde BJP state president news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x