21 November 2024 10:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

संसदेत महत्वाच्या विषयावरून विरोधकांना रोखलं जातंय तर आठवलेंना 'कविता'चे संधी | विरोधकांचा संताप

Ramdas Athawale

नवी दिल्ली, १२ ऑगस्ट | संसदेचं वरीष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये बुधवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार घडला. यावेळी विरोधकांनी आपल्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर मार्शल्सकडून खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांवर हल्ला झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेमध्ये बोलण्याची संधी देण्यात आली असता त्यांनी सादर केलेल्या कवितेमुळेही चांगलाच गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं. आठवलेंनी यमक जुळवून १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान एक कविता सादर केली. त्यावेळी पिठासीन डॉ. सस्मित पात्रा यांच्याकडे विरोधकांनी आक्षेप नोंदवत या कवितेमधील एक शब्द संसदीय नसल्याचा आरोप केला. त्यावर पात्रा यांनी मी तुमच्या मुद्याची दखल घेतली आहे असं सांगत आठवलेंना त्यांचं बोलणं पूर्ण करण्यास सांगितलं.

आठवलेंनी खास आपल्या शैलीमध्ये यमक जुळवून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. या नवीन घटनादुरुस्तीमुळे सर्व सामास वर्गातील जनतेला लाभ होणार असून पुन्हा २०२४ मध्ये मोदीच पंतप्रधान होती असं या कवितेच्या माध्यमातून आठवलेंनी मांडलं. मात्र या कवितेमध्ये त्यांनी पंगा या शब्दाला यमक जोडण्यासाठी वापरलेल्या शब्दावर विरोधी पक्षांना आक्षेप घेतला.

आठवलेंनी सादर केलेली कविता पुढीलप्रमाणे…
मेरा आज बहुतही आनंदी है मन
क्यो की पास हो रहा है १२७ वा संशोधन

अब खुश हो जाऐंगे एससी, बीसी और ओबीसी जन
वो आ गया है नजदीक क्षण

जो करती है काँग्रेस और विरोधी दलोपर वार
वो है मोदी सरकार
मोदीजी के लिये २०२४ मे खुल जाऐगा सत्ता का द्वार
मोदी हो जाऐंगी प्रधानमंत्री पद पर स्वार

काँग्रेस और विरोधी दलवाले रोज बोल रहे है हाय हाय
लेकिन नरेंद्र मोदी दे रहे है सबको सामाजिक न्याय
२०२४ मे जनता आपको करेगी बाय बाय
फिर हम काँग्रेस को करेंगे हाय हाय

अगर आप रोज करते रहोंगे हाऊस मे दंगा
तो एक दिन कर देंगे हम आपको नं*…
नरेंद्र मोदीजी से मत लो पंगा…

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Opposition Vs Ruling Party MPs fight during Ramdas Athawale Poem in Rajyasabha news updates.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x