Stock Market | पेनी स्टॉक म्हणजे नेमकं काय? | मोहात पडून खरेदी करता? - मग नक्की वाचा

मुंबई, १२ ऑगस्ट | शेअर मार्केट हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा तसेच त्या देशाच्या प्रगतीचा प्रमुख भाग असतो. शेअर बाजाराचा फायदा हा कंपन्यांना तसेच त्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला अश्या दोघांना होतो. काही लोकांना हाच शेअर बाजार जुगार आहे असे वाटते तर काहींना पैसे कमवण्याचे साधन. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की भारतातील फक्त 4% लोक शेअर मार्केटमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक करतात. शेअर मार्केटमधील महान गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीस सुरुवात केली. परंतु यात अनेकजण फसतील अशा गोष्टी आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास पेनी स्टॉकचे द्यावे लागेल.
दर्शनी मूल्यापेक्षा (Face Value) कमी बाजारभाव असलेल्या शेअर्सना सर्वसाधारणपणे पेनी स्टॉक असे म्हटले जाते. अशा कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य १०० कोटीहून कमी असते. अमेरिकेत ५ $ पेक्षा कमी बाजारभाव असलेल्या सर्व शेअर्सना पेनी स्टॉक असे संबोधले जाते. जरी अशा शेअर्समधून प्रचंड नफा होण्याची शक्यता असली तरी अचानक डिलिस्ट होऊन त्यात मोठया प्रमाणात पैसे अडकून नुकसान होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळेच गुंतवणूक तज्ञ सर्वांना त्यापासून लांब राहण्यास सांगतात. असे असले तरीही पैशांची फारशी फिकीर नसलेले, आणि फक्त पैसे टाकण्याशिवाय कोणतेही ज्ञान मिळवण्याची इच्छा नसलेले अनेक गुंतवणूकदार झटपट फायद्याच्या आशेने यात गुंतवणूक करीत असतात. तर काही गुंतवणूकदार असे आहेत की ते फक्त पेनी स्टॉक मध्येच गुंतवणूक करतात.
मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदवण्यात आलेले अनेक शेअर्स पेनी स्टॉक म्हणता येतील असे आहेत. या शेअर्सचे भाव खूपच कमी असल्याने ते आणि त्याची मागणी कृत्रिमरीत्या वाढवणे सहज शक्य आहे. अनेक लोक मोठया प्रमाणात यांची खरेदी अथवा विक्री करून त्यांना अपेक्षित असलेली दिशा देऊ शकतात. अशा कंपन्या बहुतांशी शेअरबाजार नियमावली पाळत नाहीत. वेळेवर अहवाल प्रसिद्ध करीत नाहीत त्यामुळे त्यांच्या व्यवहारावर बंदी आणता येऊ शकते.
परंतू केवळ छोट्या गुंतवणूकदारांना यातून बाहेर पडण्याची संधी असावी या हेतूनेच बाजार नियामक मंडळ त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करीत नाही. त्यामुळेच बाजारात कार्यरत असे काही विशिष्ठ घटक आक्रमक होतात. यापूर्वी असे शेअर ट्रेड टू ट्रेड या पद्धतीने केले जात असतात याचीच अलीकडील सुधारित आवृत्ती म्हणजे ए. एस. एम. द्वारे विशेष निगराणीखाली आणले जातात. यात एका विशिष्ठ मर्यादेवर किंमत किंवा उलाढाल वाढली तर तर कोणत्याही शेअर्सची वाढ थोपवण्यासाठी विविध उपाय योजले जातात. जे टी. टू. टी. पद्धतीशी मिळतेजुळते आहेत. त्याचा दर १५ दिवसांनी आढावा घेण्यात येतो.
परंतु, असे असले तरी या शेअर्समध्ये अल्पावधीत होऊ शकणारी जबरदस्त वाढ अनेकांना आपल्या मोहात पाडते. यात अल्पावधीत सहज होऊ शकणारी १० पट वाढ वर्षानुवर्षे चांगले शेअर्सही १० वर्षात दाखवू शकत नाहीत. त्यामुळे बाजारातील अनेकांचे सहज लक्ष वेधून देऊ शकतात. या काळात फायदा मिळवण्याची आशा असलेले अनेक लोक यासंबंधी अनुकूल बातम्या पसरवून आपले समभाग विकून टाकतात. याच काळात अनेक छोटे गुंतवणूकदार त्यांनी शेअर्स खरेदी केलेले असल्याने आणि त्याच वेळेस भाव खाली आणि कोणी खरेदीदार नसल्याने मोठया प्रमाणात अडकतात. त्यांना थोडा तोटा सहन करून बाहेर पडायची इच्छा असेल तरीही ते तसे करू शकत नाहीत. या काळात शेअर्सचे लिस्टिंग रद्द झाले तर पैसे गमावून बसतात.
काही पेनी स्टॉक हे मल्टीबार्गर झाल्याची उदाहरणे आहेत परंतू केवळ यामुळे ते खरेदी करणे अत्यंत धोकादायक आहे. याशिवाय त्यांच्याबद्धल ठाम निष्कर्ष काढता येऊ शकेल अशी माहिती उपलब्ध नसल्याने रिसर्च हाऊसना त्यांचा अभ्यास करता येऊ शकत नाही. सावध गुंतवणूकदारांनी पेनी स्टॉक खरेदी संबधी विचार करण्यापूर्वी खालील गोष्टीचा शोध घेणे गरजेचे आहे.
* हा शेअर्स पेनी स्टॉक (Penny Stocks) होण्यामागची कारणे कोणती ? याची किंमत कमी असली तरी आंतरिक मूल्य यापेक्षा अधिक आहे का?
* यांचा व्यवसाय कोणता आणि व्यवस्थापन कोणाचे आहे ? भविष्यकाळ कसा असेल ?
* प्रमोटर्सची भागभांडवलात टक्केवारी किती?
* ही एखाद्या मोठया कंपनीने प्रवर्तित केलेली आहे का? कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्याची त्यांची काय योजना आहे.
* यांच्या काही उपकंपन्या आहेत का ? त्यांचे इन्स्टिट्यूशनल भागीदार जसे, देशी / परदेशी वित्तसंस्था आहेत का?
* कॉर्पोरेट गव्हर्नन्स कसे आहेत?
जर आपली खरोखर खात्री झाली की या शेअर्सचा भाव कमी आहे पण त्यात आंतरिक मूल्य दडलेले आहे आणि भाव कमी राहणे हे कंपनी व्यवस्थापनाच्या नियंत्रणापलीकडचे आहे तरच यात गुंतवणूक करण्याचा थोडाफार विचार करता येईल नाहीतर हमखास परतावा देऊ शकतील अशा कितीतरी कंपन्याचे शेअर्स त्यांच्या मूल्याहून कमी किमतीत बाजारात उपलब्ध आहेत, म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांचे युनिट आहेत. तेव्हा हातचे सोडून पाळत्याच्यामागे न धावणे कधीही श्रेयस्करच
महत्वाची सूचना: पेनी स्टॉक (Penny Stocks)म्हणजे काय ? याची सर्वसाधारण माहिती होण्याच्या दृष्टीने वरील लेख लिहिला असून हा लेख पेनी स्टॉकची कोणत्याही प्रकारे शिफारस करीत नाही.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: What is Penny Stocks in stock market information in Marathi.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA