22 November 2024 5:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

'या' कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांची लॉटरी | ४०० ते ५०० टक्के टक्के रिटर्न्स

Stock Market

मुंबई, १३ ऑगस्ट | सध्या शेअर बाजारात हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन (HGS) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात Hinduja Global Solution (HGS) कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 410 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. जून 2020 मध्ये हिंदुजा ग्लोबल सोल्यूशनच्या समभागाचा भाव 666 रुपये इतका होता. मात्र, जून 2021 मध्ये या समभागाची किंमत 3397 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने हिंदुजा ग्लोबल सोल्यूशनचे पाच लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 25.5 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून हा समभाग ग्रीन झोनमध्ये आहे.

जून तिमाहीत हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन कंपनीने 117.02 कोटींचा नफा कमावला होता. गेल्यावर्षी कंपनीला 47.94 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तसेच कंपनीची ऑपरेशनल कॉस्टही 25 टक्क्यांनी वाढून 1550.52 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. गुरुवारी भांडवली बाजार बंद होताना हिंदुजा ग्लोबल सोल्यूशनच्या समभागाची किंमत 3,235.85 रुपये इतकी होती.

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स:
सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड:
गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Top gain stock Hinduja Global Solution gave 410 percent returns in one year to investors news updates.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x