22 November 2024 1:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Post Savings Scheme | महिन्याला 2 हजार गुंतवा | आणि ६ लाख मिळवा - वाचा सविस्तर

Post office Investment

मुंबई, १४ ऑगस्ट | कोरोना काळात अनेकांकडे बचत केलेले पैसे देखील संपले. पैशांची बचत करणे ही तर काळाची गरज आहे. पैशांची बचत करताना ते योग्य ठिकाणी गुंतविणेदेखील गरजेचे असते. बँकेतील योजनेत गुंतवणूक केली तर कमी व्याज मिळते आणि येथे अधिक व्याज असते तिथे धोका अधिक असतो. अशात अशी एका योजना आहे जेथे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि व्याज दर देखील चांगला मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) मध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. या स्कीममध्ये सध्या 7.10 टक्के व्याज देण्यात येत आहे. खास बाब म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 2 हजार रुपये जमा करायचे आहेत. 15 वर्षांनी तुम्हाला त्याचे 6,31,135 रुपये मिळतील. आता प्रश्न हा आहे की, एवढी मोठी रक्कम कशी मिळेल आणि एकूण किती पैसे गुंतवावे लागतील? चला जाणून घेऊया.

पहिली महत्वाची बाब म्हणजे ही स्कीम 15 वर्षांसाठी आहे. यातून मध्येच पैसे काढता येत नाहीत. 15 वर्षांनी तुम्ही याची मुदत 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता. तुम्हाला गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा फायदा दिला जातो. जर तुम्ही 15 वर्षांसाठी दर महिन्याला 2 हजार रुपये गुंतविले तर एकूण 3,36,000 रुपयांची रक्कम जमा होईल. यावर तुम्हाला 2,71,135 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेय मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 6,31,135 रुपये हाती येतील.

पीपीएफ खाते उघडण्य़ासाठी तुम्हाला केवळ 100 रुपये खर्च करावे लागतील. एका आर्थिक वर्षात कमीतकमी 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. तसेच कमीतकमी 500 रुपये गुंतवू शकता. वर्षाला 500 रुपये गुंतविले नाहीत तर तुमचे पीपीएफ खाते निष्क्रीय होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Post office public provident fund investment scheme information in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Investment(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x