22 November 2024 12:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पुणे महापालिकेची अनधिकृत नळधारकांसाठी अभय योजना | कसा आणि कुठे कराल अर्ज?

PMC Abhay Yojana

पुणे, १४ ऑगस्ट | पुणेकरांसाठी महापालिकेनं महापालिका हद्दीतल्या अनधिकृत नळधारकांसाठी एक महत्वाची अशी अभय योजना आणली आहे. ज्या योजनेच्या माध्यमातून अनधिकृत नळजोडणी नियमित करता येणं शक्य आहे. मात्र, यासाठी काही अटी घालून दिलेल्या आहेत.

शहरात अधिकृत नळजोडांएवढेच अनधिकृत नळजोड असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी हे अनधिकृत नळजोड दंड आकारून नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यासाठी जून महिन्यात स्थायी समितीने पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. स्थायी समितीच्या या निर्णयाला मुख्य सभा परवानगी देईल, या भरवशावर अंमलबजावणी करण्याची उपसूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे ही अभय योजना लगेच लागू झाली नव्हती. गेल्या आठवड्यात या ठरावाबाबत पुन्हा निर्णय घेण्यात आल्यानंतर ती लागू करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

नेमक्या काय आहेत अटी?
१. ही अभय योजना फक्त निवासी आणि व्यापारी आस्थापनांनी घेतलेल्या अनधिकृत नळजोडांसाठीच लागू राहील.
२. ही योजना फक्त तीन महिन्यांसाठीच लागू राहील.
३. ही योजना फक्त १ जून २०२१ पूर्वी अस्तित्वात असलेल्या अनधिकृत नळजोडणींसाठीच लागू राहील. त्यानंतर घेण्यात आलेल्या सर्व अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यात येईल.

कसा आणि कुठे कराल अर्ज?
* योजना जाहीर झाल्यानंतर ३ महिन्यांच्या आत तुम्हाला अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी अर्ज करायचा आहे.
* यासाठी साध्या कागदावर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित झोनच्या (स्वारगेट/ सावरकर भवन/ एसएनडीटी/ चतु:श्रुंगी/ बंडगार्डन/ लष्कर) कार्यकारी अभियंत्यांकडे अर्ज करायचा आहे.
* या अर्जात अभय योजनेसाठी अर्ज करत असल्याचं नमूद करायचं आहे.
* अर्जामध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहून सोबत एमएसईबी किंवा टेलिफोन बिल, आधारकार्डची प्रत, मालकीहक्काची कागदपत्रं जोडायची आहेत.
* अर्ज मिळाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून जागेची पाहणी केली जाईल.
* त्यानंतर नियमानुसार पात्र नळजोडण्या नियमित करण्यात येतील.
* अपात्र जोडण्यांवर कारवाई केली जाईल. सोबतच एक इंच व्यासापेक्षा जास्त व्यासाचे नळजोडणी नियमित केले जाणार नाहीत.

किती आकारलं जाणार शुल्क?
प्रत्येक नियमित करण्यात आलेल्या अनधिकृत नळजोडासाठी त्याच्या व्यासाप्रमाणे शुल्का आकारण्यात येणार आहे. अर्धा इंच व्यासाच्या निवासी नळजोडणीसाठी ४ हजार तर व्यापारी नळजोडणीसाठी ८ हजार शुल्क आकारण्यात येईल. पाऊण इंच व्यासाच्या निवासी नळजोडणीसाठी ७ हजार ५०० तर व्यापारी नळजोडणीसाठी १५ हजार आणि १ इंच व्यासाच्या निवासी नळजोडणीसाठी १९ हजार ५०० आणि व्यापारी नळजोडणीसाठी ३५ हजार ५०० रुपये शुल्का आकारण्यात येणार आहे.

नळजोडणी अधिकृत करण्यासाठी अर्जदाराने आपल्या नळजोडणीनुसार ही रक्कम महापालिकेत भरायची आहे. त्यानंतर अनधिकृतरित्या घेतलेली नळजोडणी नियमित असल्याचं समजलं जाईल. सोबतच सर्व रक्कम भरल्यानंतर मनपाकडून नियमित करण्यात आलेल्या नळजोडाला नि:शुल्क AMR मीटर बसवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा अभय योजनेमध्ये चाळ विभाग, अनधिकृत झोपडपट्टी, गांवठाण, गुंठेवारीनुसार केलेली घरे यांचाही समावेश करण्यात आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply Abhay Yojana of PMC regarding unauthorized water pipeline information in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x