24 November 2024 8:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळेंची पक्षातून हकालपट्टी करावी | तृप्ती देसाईंची राज ठाकरेंना विनंती

Raj Thackeray

मुंबई, १५ ऑगस्ट | राज्यातील प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना महत्वाच्या अशा नवी मुंबई महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अडचणी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. ज्या गजानन काळेंवर शहराची जवाबदारी होती तेच कौटुंबिक आरोपांमुळे अडचणीत आले आहेत आणि परिणामी मनसेच्या राजकीय अडचणीतही वाढ झाल्याचं समोर येतंय.

वाद राजकीय विरोधकांनी केला असता तर मनसेने त्यांच्या समाचार घेतलाही असता. मात्र स्वतःचा गजानन काळे यांच्या पत्नीने खबळजनक आरोप केल्याने मनसेच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. काही कार्यकर्ते तर आता त्यांच्या पत्नीवरही समाज माध्यमांमार्फत आरोप करू लागले आहेत. अनेकदा महिला घरातील भांडणं आणि वाद सहजरित्या सार्वजनिक करत नसतात. किंवा त्रास सहन करत असताना संबंधित कुटुंब प्रमुखाच्या चुकीच्या गोष्टीत त्यांचा सहभाग असतो असं देखील नसतं. मात्र एक विशिष्ट मर्यादा ओलांडण्यावर आणि त्रास डोईजड झाल्यावर अनेक महिला व्यक्त होतात आणि त्यात सर्व गोष्टी उजेडात आणल्या जातात. तसाच प्रकार संजीवनी काळे यांच्याबाबतीत घडल्याचं म्हटलं जातंय. त्यांच्या अनेक आरोपांमध्ये एक आरोप हा मनसे पक्षासंबंधित आहे, जो आंदोलना मार्फत केलेल्या वसुली संदर्भात आहे आणि इतर आरोप हे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील आहेत. मात्र मनसे संबंधित आरोपांवर देखील कोणतीही प्रतिकिया पक्षाने दिलेली नाही. तसेच ती दिल्यास एकप्रकारे गजानन काळे यांच्या बचावासाठी असल्याचा संदेश जाताना, महिलांच्याप्रती वेगळा संदेश जाईल अशी भीती पक्षात असल्याने त्यांची द्विधा मनस्थिती असल्याचं म्हटलं जातंय.

काल संजीवनी काळे यांच्या समर्थनार्थ भाजपच्या चित्रा वाघ पुढे आल्या होत्या आणि आज भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना एक विनंती केली आहे.

तृप्ती देसाई यांनी काय विनंती केली आहे:
गजानन श्रीकृष्ण काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने नवी मुंबई पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मात्र दोन दिवस झाले आरोपीला अटक झालेली नाही. त्यानंतर संजीवनी काळे यांना पोलीस सांगतात की तुम्ही एफआयआर मागे घ्या किंवा सेटलमेंट करा, तडजोड करा. एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर महिलेला न्याय देण्याचं काम पोलिसांचं असतं, सेटलमेंट करण्याचं नाही.” असं तृप्ती देसाई खडसावून म्हणाल्या.

राज्यामध्ये गृहमंत्री काय करत आहेत, एखादी महिला अन्याय झाल्यानंतर वाचा फोडते, गुन्हा दाखल करते, त्या आरोपीला पहिलं अटक करा ना, तातडीने गजानन काळेंना अटक झाली पाहिजे. ते मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना माझी विनंती आहे, आपण महिलांच्या सन्मानासाठी काम करता, परंतु गजानन काळेंनी ज्या पद्धतीने शारीरिक, मानसिक त्रास संजीवनी काळेंना दिला आहे. त्यावर मनसेची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे आपण तातडीने आपण मनसेच्या नवी मुंबई शहराध्यक्ष पद आणि पक्षातून गजानन काळेंची हकालपट्टी करावी, अशी भूमाता ब्रिगेडची मागणी आहे.” असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.

लागल्याचं पाहायला मिळतंय. आरोप मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale MNS) यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात मानसिक आणि शारीरिक छळासह विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला आहे. त्यानंतर, गजानन काळेंची नवी मुंबई मनसे शहराध्यक्षपद आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी करा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Trupti Desai request MNS Chief Raj Thackeray regarding action against Gajanan Kale news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x