22 November 2024 3:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मंत्री दत्तात्रय भरणे भर कार्यक्रमातील संवादात म्हणाले, 'मुख्यमंत्री मरु द्या' | शिवसेना-राष्ट्रवादीत वाद पेटणार

CM Uddhav Thackeray

सोलापूर, १५ ऑगस्ट | सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचे कार्यक्रम होते. सोलापूर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक पाच मधील देगाव देगाव रोड येथे 43 एकर जागेवर वीस हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला. वंचितचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचा भांडवली निधीतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना पालकमंत्री दत्ता भरणे बोलताना मुखमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे सोलापुरातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी आणि नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे. पालकमंत्र्यांनी ताबडतोब दिलगिरी व्यक्त करावी, नाहीतर घसरलेली जीभ बाहेर काढू अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान या प्रकरणावर पालकमंत्री भरणे यांनी माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. मुख्यमंत्र्यांविषयी माझ्यासह महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांना आदर आहे. गावरान भाषेत बोललेल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे, तसेच जर माझ्या वक्तव्यांनी कोणाची भावना दुखावली असल्यास मी दिलीगरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे

माझी वसुंधरा कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य:
रविवारी झालेल्या या कार्यक्रमात वंचितचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केले. त्यांना मुख्यमंत्री व्हा असे म्हणत कौतुक केले, त्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी चंदनशिवे यांना उत्तर देत म्हणाले आनंद दादा मला खूप काही मिळाले आहे. तुम्हाला काय द्यायचा आशीर्वाद तो माझ्या अजितदादांना द्या, असे आवाहन केले. मात्र महापौरांशी बोलताना थेट मुख्यमंत्री मरु द्या, असे वादग्रस्त वक्तव्य केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या माझी वसुंधरा अभियान कार्यक्रमातच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने उपस्थित सर्वजण आवाक झाले.

शिवसेना नेते म्हणत आहेत घसरलेली जीभ बाहेर काढू:
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री मरू द्या अशी भाषा वापरली. यावरून पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी पालकमंत्र्यांनी त्वरित दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपवावा अन्यथा शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,घसरलेली जीभ बाहेर काढू असा थेट इशारा दिला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Solapur guardian minister Datta Bhrane made controversial statement on CM Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x