21 November 2024 5:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो
x

पालकांनो सावधान | तिसऱ्या लाटेचे संकेत | बंगळुरूमध्ये ५०० तर ओडिशात १३८ मुलांना कोरोना संसर्ग - सविस्तर वृत्त

Corona Pandemic

नवी दिल्ली, १५ ऑगस्ट | शनिवारी देशात कोरोना संक्रमणाची 36,126 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. या दरम्यान, 491 लोकांचा मृत्यू झाला, तर 37,934 संक्रमित लोकांनी या आजारावर मात केली. आतापर्यंत, देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 3.21 कोटीपेक्षा जास्त झाली आहे आणि 4.31 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

केरळमधील परिस्थिती अजूनही भीषण आहे. येथे सलग पाचव्या दिवशी सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी 242 ची वाढ होऊन संख्या 1,80,244 झाली. सोमवारी, राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,69,511 होती. आतापर्यंत येथे 18,499 लोकांचा मृत्यू झाला आहे.

लहान मुलांवर परिमाणकारक:
मात्र आता लहान मुलांवर परिमाणकारक ठरेल असा अंदाज वर्तविण्यात आलेली कोरोनाची तिसरी लाट डोकं वर काढू लागली आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण मागील काही दिवसात लहान मुलांना करोना संसर्ग होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बंगळुरूमध्ये गेल्या १० दिवसात ५०० हून अधिक मुलांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता ओडिशामध्ये १३८ मुलांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

रविवारी ओडिशा सरकारच्या आरोग्य विभागाने करोना आकडेवारी जारी केली. त्यात १ हजार ५८ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यात १३८ मुलांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण करोनाचा आकडा ९ लाख ९४ हजार ५६५ पर्यंत पोहोचला आहे. तर करोनामुळे मृतांची संख्या ६ हजार ८८७ इतकी झाली आहे. रविवारी करोनामुळे ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ६१६ रुग्णांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. राज्यात करोना रुग्णवाढीचा दर १.५३ टक्क्यांवर पोहोचला आहे

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Corona Third wave nock in Odisha 138 Children Infected By Corona In A Day news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x