24 November 2024 8:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

ठाणे | मराठा विद्यार्थी वस्तीगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात मराठा समाजाच्या समन्वयकामध्ये वाद | पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप

Maratha reservation

ठाणे, १५ ऑगस्ट | आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यातील माजिवडा येथे ठाण्यातील पहिले मराठा विद्यार्थी वस्तीग्रहाचा लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. दरम्यान, येथे मराठा समन्वयकामध्ये आपापसात वाद सुरू झाला.

चळवळीत ज्यांचे योगदान नाही, कोणतेच काम केले नाही अशांचे नाव या ठिकाणी घेऊ नये, यासाठी समन्वयक रमेश आंब्रे संतापल्याचे समोर आले आहे. त्यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी समन्वयक रमेश आंब्रे यांना शांत राहण्यास सांगितले.

मराठा समाजाने अनेक शांततेत मोर्चे काढले आहेत. त्याची एकजूट मराठा समाजाला न्याय मिळवून देईल. त्यामुळे शांत रहा गोंधळ करू नका असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले. आज मराठा विद्यार्थी वस्तीगृह लोकार्पण सोहळयात जो गोंधळ उडाला त्याबाबत असे होऊ नये. तसेच, ज्या मराठा चळवळीत ज्यांचे योगदान नाही अशांचे नावे या ठिकाणी घोषित करणे चुकीचे आहे. त्यामुळे समन्वयकातील काहींना मी खडसावले. कुठेही आमच्यात फूट पडू नये सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे असल्याचे, स्पष्टीकरण रमेश आंबरे यांनी दिले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Inauguration ceremony of the Maratha student hostel in Thane in presence of Gaudian minister Eknath Shnde news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x