9 November 2024 6:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

VIDEO | हॉलिवूड सिनेमाप्रमाणे थरार | अफगाणी नागरिकांचा धावत्या विमानात प्रवेशासाठी प्रयत्न

काबुल, १६ ऑगस्ट | तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर लोक कुठल्याही परिस्थितीत देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात तीन जणांचा हाच प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला. तालिबानच्या भीतीने देश सोडण्याच्या नादात हे तिघे अमेरिकेच्या लष्करी विमानातील चाकामध्ये लपले होते. चाकाच्या जागेत लपून आपण देश सोडता येईल असे त्यांना वाटत होते. पण, त्यापैकीच तीन जण विमान हजारो फुट हवेत असताना घसरून पडले. काहींच्या मते, हे लोक विमानावर बसून आणि लटकून प्रवास करण्याच्या नादात होते.

उडत्या विमानातून लोक पडत असल्याचा व्हिडिओ अफगाणिस्तानच्या राजधानीतून समोर आला आहे. यामध्ये एका पाठोपाठ एक तीन जण विमानातून पडताना दिसून येत आहेत. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे, कुठल्याही परिस्थितीत देश सोडण्याच्या नादात हे लोक अमेरिकेच्या लष्करी विमानावर चढले होते. तसेच विमानाच्या टायरच्या जागेत लपून बसले होते. पण, काबूल विमानतळावरून जेव्हा या विमानाने उड्डान घेतले आणि विमान आपल्या वेगात आले तेव्हा एकानंतर एक तिघेही खाली पडले.

उड्डाणासाठी धावणाऱ्या विमानात प्रवेशासाठी नागरिकांची धडपड:
काबुल विमानतळावर झालेल्या गोळीबारात आत्तापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विमानतळावरही विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे. विमानतळावर जमीनीपासून काही उंचीवरच हेलिकॉप्टर उडताना दिसत आहेत. येथील रनवे रिकामा करण्याचा प्रयत्न तालिबानकडून होत आहे. एक भयंकर व्हिडिओ समोर आला असून अमेरिकन सैन्य दलाच्या विमानच्या खालील भागाला पकडून काबुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. मात्र, विमानाने गती घेताच, हे नागरिक खाली कोसळले आहेत. एका प्राध्यापकाने मुस्लीम शिरजाद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shocking Not an Hollywood movie this is Kabul international airport right now news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x