24 November 2024 6:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

बीएचआर घोटाळा | फरार भाजप आमदार चंदूलाल पटेल यांना अटकपूर्व जामीन मंजूर

BHR Scam

जळगाव, १६ ऑगस्ट | ज्यातील बहुचर्चित बीएचआर अपहार प्रकरणी जळगाव विधान परिषदेचे आ.चंदूलाल पटेल यांचा अटकपूर्व जामीन पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या न्यायालयाने मंजूर केला आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी अनेक दिग्गज गोत्यात अडकले आहेत. याच प्रकरणात आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर देखील ठेवी मॅनेज केल्याचा आरोप आहे.

गेल्या काही दिवसांपासून आ.पटेल नॉट रीचेबल असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, आमदार पटेल यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पुणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याचिकेवर न्या.गोसावी यांच्यासमोर सुनावणी झाली असता आ.पटेल यांना १ लाखाच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. आमदार पटेल यांच्याकडून ऍड.अनिकेत निकम यांनी काम पाहिले.

न्यायालयात विशेष सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण यांनी सांगितले की, आमदार पटेल यांनी २०१४ मध्ये कर्ज घेतले होते. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी पावत्या मॅचिंग करून कर्जाची परतफेड केली. त्यानंतर आमदार पटेल यांनी २०२० मध्ये बँकेला पत्र दिले की, त्यांच्या २०१८ मध्ये स्वर्गवासी झालेल्या आईने मृत्यूपत्रात त्यांना बक्षीस म्हणून बँकेच्या पावत्या दिल्या होत्या. त्याआधारे त्यांनी कर्जफेड केली. दरम्यान, या मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून जगवानी आणि खटोड यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. तर महाजन हे जामीनदार होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA Chandu Patel got bail on BHR scam news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x