22 April 2025 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा अंधकारमय दिवस येण्याची भीती | संयुक्त राष्ट्रसंघाची आपत्कालीन बैठक

Taliban in Afghanistan

वॉशिंग्टन, १७ ऑगस्ट | संयुक्त राष्ट्रसंघाच्या आपत्कालीन सुरक्षा परिषदेची बैठक झाली. या परिषेदेचे महासचिव अॅन्टिनिओ गटेरर्स म्हणाले, की अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर नियंत्रण ठेवावे. विविध प्रातांमधून लोकांना स्थलांतरण करावे लागल्याने काबूलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. लोकांना असुरक्षित वाटू लागले आहे. सर्व पक्षांनी नियमांचे पालन करून नागरिकांच्या हितांचे संरक्षण करावे, अशी गटेर्रस यांनी विनंती केली आहे.

सर्व देशांनी अफगाणिस्तानी निर्वार्सितांना स्वीकारावे आणि त्यांना पाठवून देण्याचे टाळावे. तालिबान आणि सर्व पक्षांनी आंतरराष्ट्रीय मानवता हक्क, अधिकार, सर्व नागरिकांच्या स्वातंत्र्यांचे संरक्षण करावे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी आवाहन केले.

पुन्हा अंधकारमय दिवस येण्याची भीती:
अफगाणिस्तानमध्ये महिला आणि मुलींच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याची भीती वाढत आहे. पुन्हा अंधकारमय दिवस येण्याची भीती आहे. अफगाणिस्तान महिला आणि मुलींच्या हक्कांचे सरंक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अफगाणिस्तानचे संयुक्त राष्ट्रसंघातील कायमस्वरुपी सदस्य आणि प्रतिनिधी गुलाम एम. इसाकझाई म्हणाले, की अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या विविध हक्कांवर गदा येण्याची भीती आहे. हे मी अफगाणिस्तानमधील लाखो लोकांच्यावतीने बोलत आहे. मी अफगाणिस्तानमधील लाखो महिला आणि महिलांचे स्वातंत्र्य गमविणार असल्याविषयी बोलत आहे. त्यांना शाळेत जाणे, राजकीय आणि सामाजिक जीवनात सहभाग घेण्याचे स्वातंत्र्य गमवावे लागेल, अशी भीती आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: United Nations Security Council voices concern about rights violations in Afghanistan news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या