22 November 2024 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अफगाणिस्तानकडे स्वस्त पेट्रोल-कांदे होते, पण मोदींसारखा नेता नव्हता। नेटिझन्स म्हणाले ट्विटचे ५ रुपये क्रेडिट केले

Taliban in Afghanistan

मुंबई, १७ ऑगस्ट | अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांचे सरकार कोसळले असून तालिबानने काबूलचा ताबा घेतला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी युद्धग्रस्त देश ताब्यात घेतला आहे. तालिबानी दहशतवादी रविवारी काबूलमध्ये घुसले व त्यानंतर घनी यांचे सरकार कोसळले. त्यामुळे घनी यांच्यासह नागरिक व परदेशी व्यक्ती यांना देश सोडावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले असून तेथील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना परत नेण्यासाठी अनेक देशांनी काबूल विमानतळावर विमाने पाठवली आहेत.

तालिबानने अफगाणिस्तावर ताबा घेतल्यानंतर भारतातही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जणांनी तर मोदी सरकावर टीकास्त्र सोडले असून, भाजप समर्थक पंतप्रधान मोदींचे गोडवे गाताना दिसत आहे. यातच दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या निघट अब्बास यांनी केलेले हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

तालिबानने म्हटले आहे की, ते अफगाणिस्तानमधील भारतीयांना लक्ष्य करणार नाहीत. म्हणजे त्यांना पण ठाऊक आहे की मोदींजी त्यांना तीतर बनवू शकतात, असे निघट अब्बास यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमधील तीतर हा शब्द कोंबडा या अर्थाने वापरण्यात आला असून, तालिबानने भारतीयांवर नजर टाकली तर मोदी त्यांची अवस्था एखाद्या लाचार पक्षाप्रमाणे करुन टाकतील असे संकेत ट्विटमधून दिलेत, असे सांगितले जात आहे.

तसेच बबिता फोगाटणे देखील अफगाणिस्तानमधील स्थितीवरून एक ट्विट करताना म्हटलंय की, अफगाणिस्तानकडे स्वस्त पेट्रोल होतं, स्वस्त डिझेल होतं आणि स्वस्त कांदे देखील होते, परंतु त्यांच्याकडे मोदींसारखा नेता नव्हता. मात्र त्यांच्या या ट्विटची नेटिझन्सने प्रचंड खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळतंय. अनेकांनी त्या ट्विटला पेड ट्विट म्हणत खिल्ली उडवली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Babita Phogat tweet on Afghanistan Taliban crisis news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x