ई-पीक पाहणी ॲप | पिके आणि बांधावरील झाडांची सातबाऱ्यावर ऑनलाईन अशी नोंद करा - वाचा सविस्तर
मुंबई, १८ ऑगस्ट | शेतकरी बंधुंनो नमस्कार, ई पीक पाहणी ॲप चा उपयोग करून आपल्या शेतातील पिके त्याच बरोबर बांधावरील झाले यांची नोंद सातबारावर कशी करावी या संदर्भात आपण या व्हिडीओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधुनो एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या कि हि सर्व प्रोसेस करत असतांना तुम्हाला तुमच्या शेतात असणे गरजेचे आहे कारण जेंव्हा तुम्ही तुमच्या पिकांची माहिती या e peek pahani mobile application नोंदणी कराल त्यावेळी तुमच्या शेतातील मुख्य पिकांचा फोटो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे.
ई पीक पाहणी ॲप मध्ये पिके नोंदविण्यासाठी शेतातील पिकांचा फोटो काढावा लागणार:
ई पीक पाहणी ॲप मध्ये जेंव्हा तुम्ही फोटो काढण्यासाठी कॅमेरा चालू कराल त्यावेळी या ठिकाणी थेट कॅमेरा चालू होतो. तुमच्या मोबाईलमध्ये असलेले इतर फोटो या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे जेंव्हा तुम्ही फोटो काढण्यासाठी कॅमेरा सुरू कराल त्यावेळी तुम्ही तुमच्या शेतात असणे गरजेचे आहे.
शेतातील पिके व बांधावरील झाडांची नोंद ई पीक पाहणी ॲप मध्ये करण्यासंदर्भात संपूर्ण महिती:
या लेखामध्ये मी कशा पद्धतीने शेतातील पिके व बांधावरील झाडांची नोंद e peek pahani app चा उपयोग करून नोंदविली आहे ते या लेखामध्ये अगदी सविस्तरपणे सांगितलेले आहे. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत वाचा जेणे करून तुम्ही देखील e peek pahani mobile application चा उपयोग करून तुमच्या शेतातील पिके किंवा बांधावरील झाडे तुमच्या सातबाऱ्यावर नोंदवू शकता.
ई-पीक पाहणी ॲप संदर्भात थोडीशी माहिती:
१५ ऑगस्ट २०२१ रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेबांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृह ऑनलाईन पद्धतीने ई पिक पाहणी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ई पीक पाहणी या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना तलाठी साहेबांकडे आता जाण्याची गरज राहिली नाही कारण या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे. टाटा ट्रस्टमार्फत हा ई पीक पाहणी प्रकल्प या अगोदर केवळ दोन जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरु करण्यात आला होता मात्र आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.
शेतकऱ्याने भरलेली माहिती सातबऱ्यावर येणार:
चला तर आता थोडाही वेळ न दवडता जाणून घेवूयात कि ई पीक पाहणी एप्लिकेशन चा उपयोग करून शेतातील पिकांची, झाडांची नोंदणी स्वतः सातबऱ्यावर कशी करावी. शेतकरी बंधुंनो एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या कि तुम्हाला अगदी योग्य पद्धतीने बिनचूक माहिती या ठिकाणी भरायची आहे कारण ह्या सर्व बाबी तुमच्या सातबऱ्यावर नोंदविल्या जाणार आहेत.
ई-पीक पाहणी मोबाईल ॲप ( ePeek pahani mobile app ) इंस्टाल करण्याची पद्धत:
थेट अँप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा: https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek
वरील लिंकवर अडचण येत असल्यास खालील स्टेप्स फॉलो करा:
१. तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा सुरु असल्याची खात्री करा.
२. मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर उघडा.
३. गुगल प्ले स्टोअरच्या सर्च बार मध्ये e peek pahani हा कीवर्ड टाका.
४. e peek pahani हा शब्द टाकल्यावर अनेक मोबाईल एप्लिकेशन तुम्हाला दिसतील त्यापैकी ज्या एप्लिकेशनवर Department of revenue, government of maharashtra असे लिहिलेले असेल त्या एप्लिकेशनवर टिचकी मारा म्हणजेच टच करा. हे एप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाल होण्यास सुरुवात होईल.
ई पीक पाहणी मोबाईल ॲप इंस्टाल झाल्यावर पुढील प्रोसेस:
* e peek pahani हे एप्लिकेशन पूर्णपणे इंस्टाल झाल्यावर ओपन करा.
* e peek pahani application ओपन होत असतांना या ठिकाणी काही सूचना दिसेल त्या वाचून घ्या.
* सर्व सूचना वाचल्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा.
* मोबाईल नंबर प्रविष्ट करा अशी सूचना येईल त्या खाली एक चौकट दिलेली असेल त्या चौकटीमध्ये तुमचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर टाका व पुढे या बटनावर टच करा.
* त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका व गाव दिलेल्या यादीतून निवडा. सर्व माहिती व्यवस्थित निवडल्यानंतर पुढे या बटनाला टच करा.
* जसे तुम्ही पुढे या बटनावर टच कराल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जमिनी संदर्भातील माहिती भरावी लागणार आहे.
* खातेदार निवडण्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय या ठिकाणी दिसेल जसे कि पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक व गट क्रमांक यापैकी एक कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता.
* खातेदार निवडण्यासाठी शक्यतो पहिले नाव भरावे
* दिलेल्या चौकटीमध्ये मराठी भाषेमध्ये तुमचे नाव टाईप करा आणि शोधा या बटनावर टच करा.
* खातेदार निवडा या बटनावर टच करताच तुमच्या नावासारखे इतर खातेदारांची यादी सुद्धा तुम्हाला दिसेल त्यापैकी तुमचे तुमच्या नावाच्या खात्यावर टच करा आणि पुढे या बटनावर टच करा.
ई-पीक पाहणी एप्लिकेशन मधील नोंदणी अर्ज प्रक्रिया समजावून घेवूयात:
* तुमच्या नावाच्या खाली तुमच्या खात्याचा नंबर या ठिकाणी आलेला असेल त्या समोरील चौकटीत टिक करा आणि पुढे या बटनला टच करा.
* आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे आपणाला मोबाईल क्रमांक बदलायचा असल्यास ‘ मोबाईल क्रमांक बदल’ या बटनावर टच करा.’
* तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलायचा नसल्यास पुढे या बटनाला टच करा.
* जसे हि तुम्ही पुढे या बटनाला टच कराल त्यावेळी एक OTP तुमच्या मोबाईल नंबरवर पाठविला जाईल तो OTP दिलेल्या चौकटीत अचूकपणे टाका आणि संकेतांक भरा या बटनाला टच करा.
* अशा पद्धतीने ई पीक पाहणी एप्लिकेशन नोंदणी अर्ज भरलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला एक dashboard दिसेल यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसतील जसे की,
१. परिचय.
२. पिकांची माहिती नोंदवा.
३. कायम पड नोंदवा.
४. बांधावरची झाडे नोंदवा.
५. अपलोड.
६. पिक माहिती मिळवा.
परिचय या बटनाला टच करून तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती भरू शकता तुमचा फोटो देखील अपलोड करू शकता त्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा:
* त्यासाठी परिचय या बटनाला टच करा.
* नंतर परिचय आणि खातेदाराची माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना भरावयाची आहे.
* फोटो बदलण्यासाठी फोटो निवडा या बटनावर टच करा किंवा त्या बाजूला दिसत असलेल्या कॅमेऱ्याच्या आयकॉनला टच करा आणि तुमचा फोटो काढा.
* परिचय या पर्यायाखालील चौकटीमध्ये स्त्री, पुरुष किंवा इतर असे पर्याय दिसतील त्यापैकी एक पर्याय निवडा.
* त्यानंतर सबमिट या बटनावर टच करा.
* खातेदरांची माहिती या सदरामध्ये खते क्रमांक शेतकऱ्याला निवडायचा आहे त्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टच करा आणि तुमचा खाते क्रमांक निवडा.
अशा पद्धतीने शेतकरी त्यांची वैयक्तिक माहिती भरू शकतात.
ई पीक पाहणी ॲप मध्ये पिकांची माहिती कशी नोंदवी या संदर्भात माहिती जाणून घेवूयात:
* पिकांची माहिती नोंदवा या बटनावर टच करा.
* पीक पेरणीची माहिती भरा आणि पिकांची माहिती अशा दोन सदराखाली या ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती भरावयाची आहे.
* पीक पेरणीची माहिती या सदरामध्ये खाते क्रमांक निवडा या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीवर टच करा. या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा खाते क्रमांक निवडायचा आहे.
* शेतजमिनीचा भूमापन किंवा गट क्रमांक निवडायचा आहे.
* जसेही तुम्ही तुमच्या शेत जमिनीचा गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमिनीसंदर्भातील व पोट खराबा संदर्बाह्तील सर्व माहिती या ठिकाणी आपोआप दर्शविली जाईल.
* पेज ला थोडे खाली स्क्रोल करा.
* हंगाम निवडा या पर्यायाखाली दिसत असलेल्या चौकटीवर टच करून शेतकरी खरीप किंवा रब्बी हंगाम निवडू शकतात.
पिकांचा वर्ग या पर्याय खाली दिलेल्या चौकटीवर क्लिक करताच या ठिकाणी पिकांच्या वर्गांचे अनेकज पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतील जसे की, निर्भेळ पिक म्हणजेच एक पिक, मिश्र पिक म्हणजेच अनेकज पिके, पॉली हाउस पिक, शेडनेट पिक, पड क्षेत्र या पैकी योग्य पर्याय या ठिकाणी निवडावा.
मुख्य पिकांसाहित दुय्यम पिकांची नोंद करा:
* मिश्र पीक निवडल्यानंतर तुमच्या शेतामध्ये जी पिके लावलेली आहेत आणि जेवढ्या क्षेत्रावर लावलेली आहेत ते क्षेत्र या ठिकाणी टाईप करा.
* मुख्य पिक, दुय्यम १ आणि दुय्यम २ अशी पिकांची वर्गवारी या ठिकाणी करावी लागणार आहे.
जल सिंचनाचे साधन या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीवर टच करतातच सिंचनाचे अनेक साधने या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्यापैकी तुमची तुमच्या पिकांना पाणी देण्यासाठी ज्या जल सिंचनाचा उपयोग करत आहात त्या पर्यायावर टच करा.
* त्यानंतर सिंचन पद्धत निवडायची आहे जसे कि ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन किंवा अन्यप्रकारे सिंचन या पैकी एक पर्याय या ठिकाणी शेतकऱ्याने निवडणे अपेक्षित आहे.
* लागवडीचा दिनांक या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीमध्ये ज्या दिवशी तुम्ही तुमच्या शेतामध्ये पिकांची लागवड केली आहे तो दिनांक तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे.
* सर्वात शेवटी तुमच्या शेतातील जे मुख्य पीक आहे त्या पिकाचे छायाचित्र या ठिकाणी घ्यायचे आहे. त्यासाठी कॅमेरा आयकॉन वर टच करा.
* जसे हि तुम्ही कॅमेरा आयकॉन वर टच कराल त्यावेळी तुमच्या मोबाईलमधील कॅमेरा सुरु होण्यासाठी काही परवानगी या ठिकाणी लागेल त्यासाठी allow या पर्यायावर तुम्ही टच करू शकता.
* फोटो काढल्यावर submit या बटनावर टच करा. तर अशा पद्धतीने पीक माहिती सबमिट आणि अपलोड झालेली आहे.
* पिकांची माहिती या पर्यायावर टच करून तुम्ही भरलेली माहिती बघू शकता जर तुम्हाला असे वाटत असेल कि माहिती चुकीची भरली गेली आहे तर हि माहिती डिलीट म्हणजेच नष्ट सुद्धा करू शकता.
ई-पीक पाहणी ॲपचा उपयोग करून बांधावरील झाडे नोंदविणे:
शेतकऱ्यांच्या बांधावर बरीच झाडे असतात या पैकी जर आंबा, बोअर, पिंपळ, कडूनिंब व अजूनही इतर प्रकारची झाडे असतील तर शेतकरी हि झाडे स्वतः सातबऱ्यावावर नोंदवू शकतात. बांधावरील झाडे सातबऱ्यावर नोंदविण्याची पद्धत कशी आहे ती समजावून घेवूयात.
ई पीक पाहणी ॲपच्या डॅशबोर्डवर दिसत असलेल्या बांधावरील झाडे या बटनावर टच करा:
* खाते क्रमांक निवडा.
* शेताचा गट क्रमांक निवडा.
* दिलेल्या यादीतून तुमच्या शेताच्या बांधवावर जे झाड असेल ते निवडा.
* झाडाची संख्या दिलेल्या चौकटीत टाका.
* सर्वात शेवटी बांधावरील झाडाचे छायाचित्र अपलोड करा यासाठी कॅमेरा आयकॉनच्या बटनावर टच करा.
* आमच्या शेताच्या बांधावर बोरीचे झाड आहे महणून आता या ठिकाणी बोर या झाडाचा फोटो काढून तो अपलोड करत आहे.
* छायाचित्र काढल्यावर सबमिट करा या बटनावर क्लिक करा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: How to use e Peek Pahani App in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News