24 November 2024 5:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

मोदीजींच्या मंदिरात दानपेटी नाही | परंतु मंदिराच्या वर्गणीसाठी LPG गॅसच्या दरात २५ रुपयांची वाढ केली आहे - रुपाली चाकणकर

Rupali Chakankar

पुणे, १८ ऑगस्ट | सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्यात. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केलीय. आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 859.5 रुपये झालाय. तर तो पूर्वी 834.50 रुपये मिळत होता. यापूर्वी 1 जुलै रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला IOC ने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 73.5 रुपये प्रति सिलिंडर वाढवली होती. या काळात कंपनीने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या नाहीत.

दिल्लीमध्ये 14.2 किलो सिलिंडरची सबसिडीशिवाय किंमत 834.50 रुपयांवरून 859.50 रुपये झालीय. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत आता 886 रुपये आहे. मुंबईतील सिलिंडरसाठी 834.5 ऐवजी 859.5 रुपये मोजावे लागतील. चेन्नईमध्ये सिलिंडरसाठी ग्राहकांना 850.50 ऐवजी 875.5 रुपये द्यावे लागतील.

15 फेब्रुवारीला किंमत वाढवून 769 रुपये करण्यात आली. यानंतर 25 फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलिंडरची किंमत 794 रुपये करण्यात आली. मार्च महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 819 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. एप्रिलच्या सुरुवातीला 10 रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीतील घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर 819 रुपये प्रति सिलिंडरवरून 809 रुपये करण्यात आला. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत एका वर्षात 165.50 रुपयांची वाढ झाली.

तसेच दोन दिवसांपूर्वी पुण्यात मोदी भक्तांनी पंतप्रधान मोदींचं मंदिर उभारलं आहे. याच दोन्ही विषयाला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “मोदीजींच्या मंदिरात दानपेटी नाही, परंतु मंदिरासाठी वर्गणी म्हणून LPG गॅसच्या किंमतीत २५ रुपये वाढ करण्यात आली आहे”.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP leader Rupali Chakankar critisized PM Narendra Modi over hike in LPG cylinder rates news updates.

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x