नोकरीवर EPF कापला जातो? | बॅलेन्स चेक करा | EPFO कर्मचाऱ्यांकडून २१ कोटींची हेराफेरी
मुंबई, १८ ऑगस्ट | EPFO च्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मार्च २०२० ते जून २०२१ या कोरोना संकटाच्या कालावधीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या मुंबई कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधातून २१ कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कॉमन पीएफ पूलद्वारे फसवणूक करण्यात आलीय. यापैकी सुमारे २१ कोटी रुपये काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
आतापर्यंत केलेल्या तपासानुसार घोटाळ्याचा मास्टरमाइंड मुंबई कांदिवली ईपीएफओ कार्यालयाचा अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे, ज्याने पीएफ दावा करण्यासाठी स्थलांतरित कामगाराच्या ८१७ बँक खात्यांचा कथितपणे गैरवापर केला होता. या पीएफ खात्यातून एकूण २१.५ कोटी रुपयांची हेराफेरी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
या खात्यांमध्ये हस्तांतरित केलेल्या पैशांपैकी ९० टक्के रक्कम काढण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. याशिवाय मुंबई कार्यालयातील ५ कर्मचारी या फसवणुकीमध्ये सामील आहेत, त्यापैकी मुख्य आरोपी फरार आहेत. अंतर्गत लेखापरीक्षण पूर्ण होताच ईपीएफओ हे प्रकरण सीबीआयकडे सोपवणार असल्याचे सांगितले जात आहे. द इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दरम्यान, जर तुमचे UAN EPFO मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही तुमच्या ताज्या योगदानाची आणि PF शिल्लक माहिती एका मेसेजद्वारे मिळवू शकता. उमंग अॅपद्वारे पीएफ खात्यातील शिल्लक देखील तुम्ही तपासू शकतात. तुम्ही ईपीएफओ वेबसाईटद्वारे बॅलन्स देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला EPFO पासबुक पोर्टलवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या यूएएन आणि पासबुकने लॉगिन करावे लागेल. यानंतर तुम्हाला डाऊनलोड व्ह्यू पासबुक या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: EPFO clerk siphoned rupees 21 crore through nexus in Mumbai Kandivali office scam news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS