22 November 2024 6:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीची धाड | नितीन लांडगेंना ताब्यात घेतलं | काँट्रॅक्टर्स धास्तावले

BJP Maharashtra

पिंपरी-चिंचवड, १८ ऑगस्ट | पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाड मारली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीची आजची बैठक संपताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं स्थायी समिती कार्यालयाचा ताबा घेतला. दरम्यान ही कारवाई नेमकी कुणावर झाली? या कारवाईत किती रुपये ताब्यात घेतले गेले? याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या कारवाईमुळं महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. स्थायी समितीची बैठक आज असल्यानं महापालिका इमारत परिसरात ठेकेदारांची मोठी गर्दी होती.

स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात तर मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना एसीबीकडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या सर्वांना आता पुण्याच्या दिशेनं नेण्यात आलं आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे आणि त्यांच्या पीएला एसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून, पुण्यातील कार्यालयामध्ये नेण्यात आलं आहे. अशी माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Anti Corruption Bureau raid in Pimpri Chinchwad Municipal Corporation news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x