21 November 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News
x

BJP Jan Ashirwad Yatra | मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून स्व. बाळासाहेबांच्या नावाचा वापर होणार?

Narayan Rane

मुंबई, १९ ऑगस्ट | मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जात आहेत. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं सकाळी मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर शिवसेनेच्या गड असलेल्या शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राणे वंदन घालतील. तसंच तिथल्या परिसरात वृक्षरोपण देखील करणार आहेत. तिथपासून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार आहे. दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्व. बाळासाहेबांच्या (Bal Thackeray) नावाने भारतीय जनता पक्षाचे नेते अधिकार गाजवत त्यांच्या नावाचा आधार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.

विशेष म्हणजे 2015 साली वांद्रे विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना पराभूत करणाऱ्या तृप्ती सावंत याच गुरुवारी जन आशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वागत करणार आहेत. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे सध्या मुंबईतील वातावरण तापले आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

मात्र, बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) हयात असते तर त्यांना शिवसैनिकांचे हे वागणे अजिबात आवडले नसते, असे तृप्ती सावंत यांनी म्हटले. बाळासाहेब हेच आमचं दैवत आहे. आपला जुना शिवसैनिक मोठा होतोय, याचं स्वागत व्हायला हवं. आमचं आणि बाळासाहेबांचं नातं अतूट आहे, ते कधीच संपणार नाही. आम्ही शिवसेनेपासून दुरावलो असलो तरी बाळासाहेबांपासून कधीही दुरावणार नाही, असे तृप्ती सावंत यांनी सांगितले.

स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार का? (Union Minister Narayan Rane’s Jan Ashirwad Yatra from Shivajipark)

नारायण राणेंचं मुंबईत आगामन झाल्यानंतर विमानतळावरुन ते थेट शिवाजी पार्कात जाणार आहे. तिथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ते वंदन करतील. तिथेच शेजारी असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी राणे जाणार का?, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांना आम्ही स्मृती स्थळावर जाऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतलीय. तर स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांचा आशीर्वाद घेणार असल्याचा निर्धार नारायण राणे यांनी केला आहे. त्यामुळे वाद पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.

दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या मुंबईमधल्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जमाव बंदीचे आदेश काढलेले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रा पार पडते आहे. मुंबईतल्या विविध भागांत जाऊन ते लोकांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी मुंबई पोलिसांनी यात्रेला नोटीस पाठवली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union Minister Narayan Rane’s Jan Ashirwad Yatra from Shivajipark welcome by former Shivsena MLA Trupti Sawant news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x