22 November 2024 7:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

VIDEO | Afghanistan women crying | आम्हाला तालिबानींपासून वाचवा, अफगाणी महिलांचा आक्रोश

Taliban in Afghanistan

काबुल, १९ ऑगस्ट | तालिबानची सत्ता आल्यापासून जनतेत प्रचंड दहशत आहे. लाखो लोकांना देश सोडायचा आहे. तालिबाननं अफगाणी नागरिकांना सुरक्षेचं वचन दिलं आहे. मात्र नागरिकांचा त्यांच्या शब्दावर विश्वास नाही. कोणत्याही मार्गानं देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न नागरिकांकडून सुरू आहे. काबुलच्या विमानतळावरील गर्दी कायम आहे. दिवसागणिक गर्दी वाढत आहे. याच गर्दीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Afghanistan women crying at Kabul airport) झाला आहे.

अफगाणी महिलांचा अमेरिकन लष्करासमोर आक्रोश (Afghanistan women crying at Kabul airport to save from Taliban) :

काबुल विमानतळावर प्रवेश करू देण्याची विनंती करणाऱ्या अफगाणी महिलांचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. विमानतळावर प्रवेश करू देण्यासाठी महिला अमेरिकन सैन्याकडे गयावया करत आहेत. मात्र त्यांना यश येत नाही. काबुलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिका आणि नाटोच्या सैन्यानं बॅरिकेडिंग केलं आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यास त्यांच्याकडून प्राधान्य दिलं जात आहे. त्याच दरम्यान काही अफगाणी महिला विमानतळावर पोहोचल्या आणि सैनिकांकडे रडून विनवण्या करू लागल्या.

News Title: Afghanistan women crying at Kabul airport to save from Taliban viral video news updates.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x