22 November 2024 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Jan Ashirwad Yatra | आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते, अशीच प्रगती कर | त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी - नारायण राणे

Narayan Rane

मुंबई, १९ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. मुंबई विमानतळावरुन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करुन ही यात्रा शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळ येथे दाखल झाले. यावेळी नारायण राणेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले. यासोबतच त्यांच्या स्मृतींनाही उजाळा दिला.

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन (Narayan Rane’s Jan Ashirvaad Yatra pay homage to Balasaheb Thackeray memorial)

नारायण राणेंना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊ देणार नाही असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता. मात्र राणेंनी आज नितेश राणे, प्रवीण दरेकर यांच्यासह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन केले. यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर जाऊन मी नतमस्तक झालो. मी त्यांना एवढेच सांगितले की, आज तुम्ही मला आशीर्वाद द्यायला असायला हवे होतात. मला बाळासाहेबांनीच घडवलेले आहे, दिलेले आहे. आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असेच यश मिळव आणि प्रगती कर माझा आशीर्वाद आहेत. असे म्हणत त्यांनी डोक्यावर हात ठेवला असता. आज त्यांचा हात नसला तरी आशीर्वाद माझ्यासोबत आहेत’ असे राणे म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुक, पापाचा घडा फुटणार:
नारायण राणे यांनी बोलताना मुंबई महापालिका निवडणुकांवरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, शिवसेनेचा मुंबई मनपातील 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचेच सरकार येईल. मुंबई महापालिका जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. ही महापालिका काही झाले तरी आम्ही जिंकणारच, असा निर्धार राणेंनी व्यक्त केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Narayan Rane’s Jan Ashirvaad Yatra pay homage to Balasaheb Thackeray memorial news updates.

हॅशटॅग्स

#JanAshirwadYatra(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x