22 November 2024 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Anil Deshmukh in Supreme Court | अनिल देशमुखांची ED बाबतीतली याचिका सुप्रीम कोर्टाकडून स्विकृत

Anil Deshmukh

नागपूर, १९ ऑगस्ट | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीकडून (सक्तवसुली संचालनालय) आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावण्यात आले होते. याबाबत अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून आता हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईडीच्या कार्यालयात आपण चौकशीसाठी उपस्थित राहू, असे पत्र अनिल देशमुख यांनी प्रसिद्ध केल आहे.

अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली (Supreme court accepted petition filed by Anil Deshmukh over ED action case) :

सीबीआयविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली:
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांची सीबीआयकडूनजी चौकशी सुरू आहे याबाबत दिलासा मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख यांनी याचिका केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने काल 18 ऑगस्ट रोजी ही याचिका फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. मात्र, ईडीच्या चौकशीबाबत केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज स्वीकारली आहे, त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण ईडीसमोर चौकशीसाठी हजर होऊ, असा या पत्रातून अनिल देशमुख म्हणाले.

अनिल देशमुखांना फरार घोषित करण्याची सोमैय्यांची मागणी:
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फरार घोषित करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी केली आहे. तसेच, पाच वेळा समन्स बजावूनही ईडी (सक्तवसुली संचलनालय) कार्यालयात अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहिले नाहीत, त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात यावे, अशी मागणी मुंबईत पत्रकार परिषदेतून किरीट सोमैय्या यांनी काल (18 ऑगस्ट) केली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title:  Supreme court accepted petition filed by Anil Deshmukh over ED action case news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x