22 November 2024 6:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते - नितीन गडकरी

Nitin Gadkari

नवी दिल्ली, २० ऑगस्ट | माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी हे “भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते” असल्याचे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी बुधवारी म्हटले आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि सन्मानाने वागले पाहिजे असेही ते म्हणाले आहेत.

जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते: नितीन गडकरी (Jawaharlal Nehru and Atal Bihari Vajpayee ideal leaders of India democracy said Nitin Gadkari) :

न्यूज नेशन वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, नेहरू आणि वाजपेयी हे भारताच्या लोकशाहीचे दोन आदर्श नेते होते आणि दोघेही मी माझ्या लोकशाहीचे सन्मानाचे पालन करीन असे म्हणायचे. “अटलजींचा वारसा आमची प्रेरणा आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही भारतीय लोकशाहीमध्ये मोठे योगदान होते,” असे गडकरी यावेळी म्हणाले.

सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकदा आत्मपरीक्षण करू द्या. कारण आज जो विरोधीपक्ष आहे तो उद्या सत्ताधारी असणार आहे. तर, आजचा सत्ताधारी पक्ष उद्याचा विरोधी पक्ष असणार आहे. त्यामुळे आमच्या भूमिका बदलत राहतात, असे गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम करतानाची आठवण गडकरींनी सांगितली. एक वेळ अशी होती, जेव्हा सभागृहात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा एकदा अटलजींना भेटलो होतो. ते मला म्हणाले की, लोकशाहीत काम करण्याचा हा मार्ग नाही. लोकांपर्यंत तुमचा संदेश पोहोचवणे महत्त्वाचे आहे. सत्ताधारी आणि विरोधकांना लोकशाहीची दोन चाके असतात. ही लोकशाही यशस्वी करण्यासाठी सशक्त विरोधी पक्ष देखील आवश्यक आहे. नेहरूंनी वाजपेयीजींचा नेहमीच आदर केला आणि ते म्हणाले की विरोध देखील आवश्यक आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Jawaharlal Nehru and Atal Bihari Vajpayee ideal leaders of India democracy said Nitin Gadkari news updates.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x