22 November 2024 1:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

तालिबानकडून काबूल विमानतळावरुन भारतीयांसह अनेक प्रवाशांचं अपहरण | काय म्हटलं तालिबानने

Taliban in Afghanistan

काबुल, २१ ऑगस्ट | तालिबानने काबूल विमानतळावरुन काही प्रवाशांचं अपहरण केल्याचं वृत्त अफगाणिस्तानातील मीडियाने दिलं आहे. यामध्ये काही भारतीयांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. भारत सरकारने याबाबत अधिकृत काहीही माहिती दिलेली नाही. काबूलमधील हामीद करजई इंटरनॅशनल एअरपोर्टरजवळूनच या नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

तालिबानने काबूल विमानतळावरुन काही प्रवाशांचं अपहरण केल्याचं वृत्त अफगाणिस्तानातील मीडियाने दिलं (150 People Mostly Indians Captured By Taliban Near Kabul Airport Reports) :

अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर शेकडो भारतीय नागरिक मायदेशी परतण्यासाठी वाट पाहात होते. पण त्यांना तालिबान्यांनी विमानतळाबाहेर नेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याचं वृत्त अफगाण माध्यमांमध्ये प्रासरित केलं जात होतं. यावर तालिबानचा प्रवक्ता अहमदुल्ला वसेक यानं अधिकृतरित्या समोर येत भारतीय नागरिकांचं अपहरण करण्यात आलेलं नाही आणि सर्व नागरिक सुखरूप असल्याचं स्पष्ट केलं आहे.

काबुलमधील सर्व भारतीय नागरिक सुखरुप असून त्यांच्या सुरक्षेसाठीच त्यांना विमानतळाजवळील एका गॅरेजमध्ये हलविण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. याच ठिकाणी त्यांची सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत असून त्यांच्या मायदेशात परतण्यासाठीची पुढची प्रक्रिया सुरू आहे, असं वृत्त आता अफगाण माध्यमांमध्ये प्रसारित केलं जात आहे. (150 People Mostly Indians Captured By Taliban Near Kabul Airport Reports)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: 150 People Mostly Indians Captured By Taliban Near Kabul Airport Reports news updates.

 

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x