16 April 2025 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

Expired Things | एक्स्पायर झालेले पदार्थ, वस्तू फेकून देता? | मग आधी हे वाचा

How to use expired things

मुंबई, २३ ऑगस्ट | आपल्या घरात असे अनेक पदार्थ असतात जे एक्स्पायर झाल्यानंतर फेकून दिल्या जाते. पण तुम्हाला माहिती आहे का एक्स्पायर झालेल्या पदार्थांचा वापर घरकामासाठी करता येतो. खाण्या-पिण्याच्या सर्वच वस्तूवर एक्स्पायरी डेट दिलेली असते. त्या पदार्थांचा वापर करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणून एक्सपायरी डेट निघून गेली की पदार्थ फेकून देतात. अशा पदार्थांचा वापर तुम्ही घरातील अनेक कामांसाठी करू शकता. प्रत्येक पदार्थांच्या पॅकेटवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. यानंतर ते वापरता येत नाही. पदार्थ एक्सपायर झाल्यानंतर खाद्यपदार्थांमधील चव बदलुन त्याच्या रंगात बदल होतो. तर अनेक पदार्थांना दुर्गंध देखील येतो. यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे.

एक्स्पायर झालेले पदार्थ वस्तू फेकून देता?, मग आधी हे वाचा (How to use expired things information in Marathi) :

* चहा:
चहा पावडर एक्सपायर झाल्यास आपण ती फेकून देण्याचा विचार करतो. परंतु असे न करता तुम्ही जर एक्सपायरी चहा पावडरचे पाणी गुलाबाच्या झाडांना टाकल्यास अनेक फूल येतात. तसेच गुलाबाच्या झाडाची वाद होण्यास मदत मिळते.

* मेयोनीज:
मेयोनीजची एक्सपायरी डेट सपल्यास ते फेकून न देता त्याचा घरकामासाठी वापर करावा. याचा वापर फ्रीज किंवा किचनच्या ट्रॉलीमधील दाग स्वच्छ करण्यासाठी याचा वापर केला जातो. स्टीलच्या भांड्यावर मेयोनीज लावून ब्रशच्या मदतीने 10 मिनिटे घासावे. त्यानंतर पाणी टाकून कापडाने स्वच्छ करावे. यामुळे भाड्यावरील डाग कमी होण्यास मदत मिळते.

* कॉफी:
एक्सपायरी झालेल्या कॉफीच वापर त्वचेसाठी आणि झाडांसाठी सुद्धा होतो. कॉफीचा वापर झाडांच्या खतासाथी सुद्धा करता येतो. तसेच त्वचेसाठी स्क्रब तयार करण्यासाठी सुद्धा वापर होतो. झाडासाठी खत तयार करतांना एका भांड्यात 1 चमचा कॉफी मातीत मिक्स करावी. हे मिश्रण तुम्ही कोणत्याही झाडासाठी वापरू शकता.

फेस स्क्रब तयार करण्यासाठी 2 चमचे एलोवेरा जेल घ्यावे आणि एक चमचा कॉफी घ्यावी. याचे मिश्रण चांगले मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावी. 20 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. असे केल्याने चेहऱ्यावरील डेड स्कीन निघयन जाण्यास मदत मिळते.

कालबाह्य झालेले अन्न वापरण्याचे उपयुक्त मार्ग (Useful Ways To Use Expired Foods) :

* ब्राऊन शुगर:
ब्राऊन शुगर जर कडक झाली असेल तर अनेक लोक ती फेकून देतात. याचा वापर त्वचा निरोगी ठेवण्यासाठी केला जातो. कडक झालेली ब्राऊन शुगर चांगली बारीक करून ठेवू शकता. याचा वापर फेस स्क्रब आणि बॉडी स्क्रब म्हणून वापर करता येतो. स्क्रब तयार करण्यासाठी ब्राऊन शुगरमध्ये गुलाबजल आणि बदाम तेल मिक्स करावे. या स्क्रबमुळे त्वचा मऊ होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to use expired things information in Marathi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Social(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या