22 November 2024 7:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Hernia Symptoms & Treatment | 'हर्निया' आजाराची लक्षणे आणि कारणे - नक्की वाचा

Hernia symptoms and treatment

मुंबई, २३ ऑगस्ट | हर्निया हा आजकाल अनेक लोकांमध्ये पाहिला जातो. हर्निया म्हणजेच सभोवतालच्या तंतू किंवा स्नायूंच्या दुर्बल ठिकाणातून, अवयवाचे किंवा चरबीयुक्त तंतूंचे पसार होय. सामान्यतः हा आजार जाड व्यक्तीमध्ये होताना दिसून येतो. हर्निया हा लहान मुलांपासून ते मोठ्या वयाच्या स्त्री आणि पुरुषांपर्यंत सर्वांना होताना दिसतो. हर्निया तेव्हा होतो जेव्हा पोटातील साठलेल्या जागेभोवतीचे आतडे किंवा पिशवीचा भाग उदराच्या भितींमध्ये शिरून त्या भागाला पीळ बसतो.

‘हर्निया’ आजाराची लक्षणे आणि कारणे (Hernia symptoms and treatment in Marathi) :

हर्निया ही समस्या अशा लोकांमध्ये उद्भवते ज्यांचं वजन जास्त झालं आहे किंवा त्यांना गंभीर दुखापत झाली आहे किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. याव्यतिरिक्त ज्यांना बहुतेक बद्धकोष्ठतेची समस्या आहे किंवा ज्यांना दीर्घकाळापर्यंत खोकला आहे अशा लोकांमध्येदेखील होतो. गर्भवती महिलेस देखील हर्निया होण्याची शक्यता असते.

हर्नियाचे प्रकार वेगवेगळॆ असतात आणि त्यानुसार त्यांची लक्षणे बदलत जातात. नेहमीच्या लक्षणांमध्ये असे होते की पोटाच्या किंवा ओटीपोटाच्या भागात तीव्र वेदना, सूज होणे इत्यादी. हॅटेल प्रकारच्या हर्निया मध्ये पोट रिकामे असल्यास पोटाच्या वरच्या भागात वेदना जाणवतात. हर्निया जर वाढला तर प्रसंगी उलट्या सुद्धा होऊ शकतात. प्रौढांमध्ये त्यांच्या नाभीच्या ठिकाणी सूज दिसते. लहान मुलांमध्ये बेंबीच्या ठिकाणी हर्निया मध्ये नाभीच्या ठिकाणी रडण्यामुळे सूज येते.

हर्नियाचे ५ प्रकार आहेत: (Types of Hernia in Marathi)

* स्पोर्ट्स हर्निया : स्पोर्ट्स हर्निया खालच्या ओटीपोटात आणि मांडीच्या दरम्यान होतो.
* नाभीसंबधीचा हर्निया : हा लहान मुलांमध्ये होतो. 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये या प्रकारच्या हर्नियाची जास्त शक्यता असते.
* इन्सिजनल हर्निया : एखाद्याच्या पोटात शस्त्रक्रियेनंतर हा हर्निया होण्याची शक्यता जास्त असते.
* हाईटल हर्निया : हे ओटीपोटात असलेल्या मोठ्या आतड्याद्वारे छातीपर्यंत पोहोचते. या हर्नियाचा पोटातील स्नायूंवर वाईट परिणाम होतो.

हर्नियाची लक्षणं: (Hernia symptoms in Marathi)

* हर्नियाच्या लक्षणांमध्ये ओटीपोटात चरबी बाहेर येते
* लघवी होण्यात अडचण होते
* खालच्या ओटीपोटात सूज येते
* तसंच बराच काळ बसून राहणाऱ्या आणि समान स्थितीत उभे असणाऱ्या लोकांनी त्वरित हर्नियाची चाचणी केली पाहिजे.

यावर उपचार म्हणून शस्त्रक्रिया सांगितली जाते. शास्त्रक्रिया ही चीर देऊन किंवा लेप्रोस्कोपिक पद्धतीने करता येते. वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्यासांठी शस्त्रक्रिया टाळली जाते. आहारातील बदलामुळे बरीचशी हर्नियाची लक्षणे कमी होतात. स्नायूंना बळकटी देण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. तिखट आणि आंबट पदार्थ टाळावे तसेच जेवल्यानंतर लगेच झोपू नये.

हर्नियाचा उपचार: (Treatment on Hernia in Marathi)

शस्त्रक्रियेद्वारे हर्नियावर उपचार केला जातो. हर्नियामध्ये दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत – प्रथम खुली शस्त्रक्रिया आणि दुसरी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया. खुल्या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला 6 महिने विश्रांती घेण्यास सांगितले जाते. यात एखादी व्यक्ती 6 महिन्यांपर्यंत कोणतीही शारीरिक क्रिया करू शकत नाही. त्याच वेळी लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये सामान्य भूल देऊन स्थानिक शस्त्रक्रिया केली जाते. त्यात एक छोटासा चीरा बनवला जातो. डॉक्टर केवळ हृदय रुग्णांनाच हृदय शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. तज्ज्ञांच्या मते, हर्नियाच्या घरगुती उपचारांमध्ये गरम पाण्याचे सेवन, मालिश, योगासन, दालचिनी आणि सफरचंद व्हिनेगरचा समावेश आहे.

हर्नियामध्ये लक्षात ठेवण्याच्या गोष्टी:
हर्नियाची समस्या टाळण्यासाठी वजन नियंत्रित केलं पाहिजे. जास्त तंतुमय पदार्थांचं सेवन करताना आणि प्रथिनं खाताना जास्त चरबीयुक्त पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. धूम्रपान, मद्यपान वगैरे व्यसन देखील टाळलं पाहिजे. एखाद्यानं जास्त वजन असलेल्या वस्तू उचलू नयेत. असं केल्याने हर्नियाची वेदना वाढू शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: Hernia symptoms and treatment in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x