24 November 2024 6:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

चंद्रपूर | जादूटोण्याच्या संशयावरून सात जणांना भर चौकात हातपाय बांधून जबर मारहाण

witchcraft incident

चंद्रपूर, २३ ऑगस्ट | जादूटोण्याच्या संशयावरून सात जणांना भर चौकात हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आली. यात वयोवृद्ध गटातील महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. ही संतापजनक घटना दुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील वणी बुद्रुक येथे शनिवारी घडली. यात पाच जण जबर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चंद्रपूरमध्ये जादूटोण्याच्या संशयावरून सात जणांना भर चौकात हातपाय बांधून जबर मारहाण (7 peoples tied up on suspicion of witchcraft incident happened in Chandrapur Jivati Taluka) :

21 व्या शतकात आजही समाज अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे चित्र दिसून येत आहे. नरबळीचा प्रयत्न, अंधश्रद्धेतुन लोकांना सामूहिक मारहाण असे प्रकारही चंद्रपूर जिल्ह्यात घडले आहेत. याचा कळस जिवती तालुक्यातील वणी बुद्रुक या गावात दिसून आला. वणी बुद्रुक या गावात अंधश्रद्धेचा पगडा आहे. शनिवारी काही महिलांच्या अंगात आले. त्यांनी पीडित लोकांची नावे सांगितली. यानंतर गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी गावातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमध्ये शांताबाई भगवान कांबळे (53), साहेबराव एकनाथ हुके (48), धम्मशिला सुधाकर हूके, पंचफुला शिवराज हुके, प्रयागबाई एका जबर जखमी झाले. या प्रकरणात 13 जणांना जिवती पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी घडली.

घटनेची माहिती जिवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गावात पोहोचले आणि त्यांनी पीडितांची सुटका केली. यावेळी त्यांना बांधून ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे गावात दहशतीचे वातावरण असल्यामुळे कोणीच काही बोलायला तयार नव्हते. (Seven peoples tied up on suspicion of witchcraft incident happened in Chandrapur)

यानंतर रविवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. धनंजय तावाडे आणि अनिल दहागावकर यांनी गावकऱ्यांशी चर्चा करत त्यांनी विश्वासात घेतले तेव्हा तेथील प्रत्यक्षदर्शीने 13 जणांची नावे सांगितली. त्यानुसारच एका पीडित महिलेच्या बयानवरून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: 7 peoples tied up on suspicion of witchcraft incident happened in Chandrapur Jivati Taluka.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x