21 November 2024 9:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राणेंवर 3 ठिकाणी गुन्हे दाखल | पुणे, नाशिक पोलिसांकडून अटक वॉरंट | पथक चिपळूणला रवाना

Narayan Rane

मुंबई, २४ ऑगस्ट | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवले आहे. पुणे, रायगड आणि नाशिक येथे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्र्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले आहे. पुण्यातील चतुश्रुगी पोलिस ठाण्याचे एक पथक रायगडमधील चिपळूणला रवाना झाले आहे. असे सांगितले जात आहे की ही टीम नारायण राणे यांना अटक करणार आहे. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये सहभागी असलेले नारायण राणे सोमवारपासून येथेच आहेत.

पुणे, रायगड आणि नाशिक येथे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्र्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे – Case has been registered against union minister Narayan Rane :

राणे हे राज्यसभेचे खासदार आहेत, त्यामुळे पोलिसांना प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. अटकेनंतर ही माहिती राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना दिली जाईल. पोलिस त्यांना हिंदीत किंवा इंग्रजीत ही माहिती देतील. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक दिसत आहेत. नाशिकमधील भाजप कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेकही केली.

राणेंविरोधात 3 एफआयआर दाखल:
राणे यांच्या वक्तव्याबाबत नाशिकचे शिवसेना पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी नाशिकच्या महाड पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. आपल्या तक्रारीत सुधाकर म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि घटनात्मक पदावर आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेले वक्तव्य संपूर्ण राज्याचा अपमान आहे. सुधाकर यांच्या तक्रारीवरून नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 502, 505 आणि 153 (A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, राणेंच्या वक्तव्यामुळे समाजात द्वेष निर्माण होऊ शकतो आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. यानंतर युवा सेनेचे सचिव रोहित कदम यांनी पुण्यातील चतुश्रुगी पोलिस ठाण्यात IPC कलम 153, 153 B (1) (C), 505 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. असाच एक गुन्हा रायगडमध्येही नोंदवण्यात आला आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?
मुख्यमंत्र्यांना कोण सल्ला देतो हे त्यांनाच कळत नाही. ते आम्हाला काय सल्ला देणार, ते काय डॉक्टर आहेत? तिसऱ्या लाटेचा त्यांना कुठून आवाज आला, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणावं. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची तुम्हाला माहिती नसावी, या शब्दांत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Case has been registered against union minister Narayan Rane news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x