21 November 2024 9:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अटक होताच नारायण राणेंची प्रकृती बिघडली | रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता

Narayan Rane

रत्नागिरी, २४ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र आता नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

अटक होताच नारायण राणेंची प्रकृती बिघडली. रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता – After arrest Narayan Rane facing sugar and blood pressure soon may shift to hospital :

नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी नितेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. पोलीस नारायण राणेंना घेऊन रवाना झाले आहेत.

दुसरीकडे नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयानं फेटाळून लावला आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, उच्च न्यायालयाने तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिल्याचं कळतंय. त्यामुळे राणे यांना हायकोर्टाकडून लगेच दिलासा मिळण्याची शक्यता तूर्तास धुसर असल्याचं पाहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर राणे यांच्या प्रकृतीबाबतीत एक मोठी माहिती समोर आली आहे.राणे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना बीपी आणि शुगरचा त्रास जाणवत आहे. राणे लवकरच रुग्णालयाच दाखल होण्याची शक्यता आहे. तशी माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिलीय.

डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली: (After arrest Narayan Rane facing sugar and blood pressure soon may shift to hospital)
नारायण राणे यांना अटक करण्यात आलं आहे. मात्र, त्यांची प्रकृती बिघडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या शरीरातील साखरेचे तसेच रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे. प्रकृती अस्वास्थायमुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. सध्या त्यांना अटक झाली असली तरी डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title:  After arrest Narayan Rane facing sugar and blood pressure soon may shift to hospital news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x