26 November 2024 1:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

मुंबई महापालिका निवडणूक | शिवसेनेकडून 'नारायण अस्त्र' निकामी | अस्त्र भाजपवरच कोसळलं? - सविस्तर वृत्त

Mumbai Municipal Corporation Election 2022

मुंबई, २५ ऑगस्ट | भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रोजच्या रोज होणारी जहरी टीका तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून धडा शिकवल्याने शिवसेनेतील मरगळ दूर होणार असून सहा महिन्यांनी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मराठी मतांचे ध्रुवीकरण घडून येईल व त्याचा लाभ पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मुंबई महापालिका निवडणूक, शिवसेनेकडून ‘नारायण अस्त्र’ निकामी केले, अस्त्र भाजपवरच कोसळलं – Mumbai Municipal Corporation Election 2022 Shivsena will gain because of BJP leader Narayan Rane :

गेली २८ वर्षे मुंबई पालिकेवर सेनेची सत्ता आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मुंबईवर झेंडा फडकवण्याचा भाजपचा चंग आहे. शिवसैनिक रस्त्यावर असतो, तो संघटनेसाठी सुगीचा काळ असतो. सेना राज्यात सत्तेत असल्याने शिवसैनिकांना आंदोलन करता येत नाही. त्यामुळे संघटनेत तशी मोठी मरगळ आहे.

मुंबईत ४२ टक्के मराठी टक्का असून हिंदी भाषिकांचा मत टक्का ३९ टक्के आहे. २०१७ च्या पालिका निवडणुकीत मराठी मतदारांत मोठी फाटाफूट झाली होती. मुंबईतली भाजप अजूनही पूर्णपणे अमराठी आहे. भाजपच्या ८४ नगरसेवकांत ४२ अमराठी नगरसेवक आहेत. कोकणी माणूस हा सेनेचा कणा आहे. त्याला आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने कोकणी पट्ट्यातील सर्वात मोठा नेता असलेल्या नारायण राणे यांना पक्षात घेतले.

मुंबईत राणे यांची व्हाेट बँक नाही आणि त्यांचा पूर्व राजकीय इतिहास आणि प्रवास मराठी माणसाला सर्वश्रुत आहे. राणे कुटुंबीयांचा सिंधुदुर्गातल्या केवळ कणकवली, वैभववाडीत राजकीय प्रभाव आहे. ते एकहाती मुंबईतील मराठी माणूस भाजपकडे आणतील हा भाजपचा अंदाज म्हणजे त्यांना राजकारण कळत नाही का? असा देखील प्रश्न उपस्थित होतोय.

शिवसेनेचे मुंबईतील राजकारण पूर्णपणे भावनेवर चालते. शिवाजी पार्कवर राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेने सेनेत मोठी अस्वस्थता होती. मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात संयमाने स्थिती हाताळल्याने त्यांचे नेतृत्व उजळून निघाले. राणे आणि भाजपला उद्धव यांनी अटकेच्या कारवाईने जशास तसे उत्तर दिल्याने शिवसैनिकांत चैतन्य निर्माण होणार आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईतल्या वार्डावार्डात सध्या शिवसैनिक आंदोलन करत आहेत.

राणेंना शिवसेना किंवा शिवसैनिक घाबरतात हा दिल्लीचा भ्रम मोडून काढला:
राणे हे ज्या पक्षात गेले तिथे त्यांनी संपूर्ण शिवसेना तुमच्या पक्षात आणतो अशी आश्वासनं दिल्याचं जुने सहकारी सांगतात. मात्र तसं कधीच झालं नाही. त्याच आश्वासनांवर त्यांनी भाजपात केंद्रीय मंत्रिपद मिळवलं आणि मुंबईत येताच शिवसेनेविरोधात कामाला लागले. सध्याच्या घडीला भाजपात शिवसेनेविरोधात आक्रमक कार्यकर्त्यांच्या फौजा नाहीत. त्यात भाजपकडे फडणवीसांसहित मुंबईकरांच्या पसंतीचा किंवा प्रभाव असलेला चेहराच नाही. कारण फडणवीस स्वतः नागपूरचीही खात्री पक्षाला देऊ शकत नाहीत. तर मुंबईतील डझनभर आमदार हे केवळ मोदी लाटेवर निवडून आलेले आहेत, ज्यामध्ये स्वकर्तृत्व अजिबात नाही. परिणामी भाजपने शिवसेनेविरोधात कोंकणी ‘नारायण अस्त्र’ फेकलं आणि शिवसेनेने त्या अस्त्राची दुर्दशा करून दिल्लीला एक संदेश दिल्याचं म्हटलं गेलंय. वास्तविक नारायण राणे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना जेवढं लक्ष करतील तेवढी भाजपाची मतं कमी होत जातील असं राजकीय विश्लेषक सांगतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai Municipal Corporation Election 2022 Shivsena will gain because of BJP leaderNarayan Rane.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x