24 November 2024 7:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

नेत्यांनी बोलताना काही पथ्य पाळायला हवीत | भाजप खासदारांचा घरचा आहेर | राणेंची ब्राह्मण टिपणी टोचली?

MP Girish Bapat

पुणे, २६ ऑगस्ट | आम्ही नारायण राणेंच्या वक्तव्याचं अजिबात समर्थन करत नाही. पण भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर आता पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश बापट यांनी राणेंना अप्रत्यक्षरीत्या सुनावलं आहे. राजकीय पक्षांमध्ये राजकीय मतभेद असतात. पण नेते मंडळींनी बोलताना पथ्य पाळलं पाहिजे, अशा शब्दात खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना घरचा आहेर दिला.

नेत्यांनी बोलताना काही पथ्य पाळायला हवीत, भाजप खासदारांचा घरचा आहेर – BJP MP Girish Bapat indirectly criticized Narayan Rane over his controversial statement against CM Uddhav Thackeray :

भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नारायण राणेंना घरचा आहेर दिला. राजकीय पक्षात मतभेद असतात. पण सर्वच पक्षातील नेत्यांनी बोलताना भाषण करताना काही पथ्य पाळली पाहिजेत. त्यात सर्वच पक्ष आहेत. त्यात मुख्यमंत्री असतील, नारायण राणे असतील यांनी आपआपली मते मांडायला हरकत नाही. पण अनेक गोष्टीत अडचणी दिसतात, मग त्याचं रुपांतर नको त्या गोष्टीत होतं. हे सर्वांनी टाळलं पाहिजे, असं बापट म्हणाले.

शुद्धीकरणासाठी ब्राह्मण हवा होता:
राणेंच्या भेटीनंतर शिवसेनेने शिवाजीपार्क येथील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले होते. त्यावरून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. शुद्धीकरणासाठी ब्राह्मण लागतो. शिवसेनेकडे आहेत कुठे? आमच्याकडे मागायला हवा होता. आमच्याकडे खूप आहेत, असा टोला नारायण राणे यांनी लगावला होता. दरम्यान, हा टोला भाजपमधील ब्राह्मण नेत्यांनाही लागल्याचं बोललं गेलं आणि आज गिरीश बापट यांनी दिलेली प्रतिक्रिया त्याचाच भाग असल्याची चर्चा आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MP Girish Bapat indirectly criticized Narayan Rane over his controversial statement against CM Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#GirishBapat(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x