Health First | 'Anxiety' हा आजार काय आहे? | लक्षणे आणि उपचार कोणते - नक्की वाचा
मुंबई, २६ ऑगस्ट | जीवणात कधी कधी अशी व्यथित करणारी परिस्थिती निर्माण होत असते की आपण चिंतीत आणि भयभीत होऊन जातो. अशावेळी अचानक आपण चिंता करू लागतो. मन भयभीत होऊ लागते यालाच anxiety असे देखील म्हटले जाते. Anxiety म्हणजे चिंता, काळजी, भीती, कळकळ होय. जेव्हा कधीही कोणाला anxiety होत असते. तेव्हा त्याच्या हदयाची धडधड वाढलेली असते. त्याला असे वाटु लागते की माझं हृदय बाहेर येऊ लागेल. इतक्या जोरजोरात त्याच्या हदयाचे ठोके चालू लागतात.
‘Anxiety’ हा मानसिक आजार काय आहे? | लक्षणे आणि उपचार कोणते – Anxiety symptoms and treatment in Marathi :
आज आपण ह्याच महत्वाचा विषयावर आज सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत की anxiety म्हणजे नेमकी असते काय? anxiety ची कारणे कोणकोणती असतात? anxiety ची लक्षणे कोणकोणती असतात? Anxiety वर कोणती तपासणी आणि उपचार केले जातात. इत्यादी बाबींविषयी आपण जाणुन आहोत.
Anxiety म्हणजे काय?
Anxiety हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे. चिंता आणि भीतीच्या वातावरणात असताना काहीतरी वाईट होण्याची भीती तसेच शंका असणे, म्हणजे anxiety असणे होय. पण खरे पाहायला गेले तर ह्या भीतीची आणि चिंतेची मुळात कोणती वास्तविकताच असतित्वात नसते. थोडी फार चिंता होणे तसेच भीती वाटणे ह्या गोष्टी तर प्रत्येकाच्या आयुष्यात साहजिकच असतात, थोडी फार चिंता करणे पण आपल्या स्वताच्या उज्वल भविष्यासाठी गरजेचेच असते. पण ह्याच चिंतेचे प्रमाण वाढत गेले तर मग तीच चिंता तसेच भीती पुढे जाऊन आपल्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक जीवनावर परिणाम करत असते. तेव्हा हीच चिंता आणि भीती anxiety चे रूप धारण करत असते.
Anxiety ची कारणे किती आणि कोणकोणती असतात?
तसे पाहायला गेले तर anxiety ची खुप वेगवेगळी कारणे असतात. पाहिजे ते ध्येय प्राप्त न होण्याची भीती, बदनामीची भीती इत्यादी वेगवेगळी anxiety ची कारणे आपल्याला दिसुन येतात. त्याचपैकी काही महत्वाची कारणे आपण आज जाणुन घेणार आहोत.
1) भुतकाळातील त्रासदायी आणि वाईट आठवणी:
भुतकाळातील वाईट अनुभसव हे anxiety चे महत्वाचे कारण असु शकते. कारण भुतकाळात आपल्यासोबत अशा काही घटना तसेच प्रसंग घडलेले असतात ज्यांच्यामुळे आपल्याला सतत त्रास होत असतो. मग ती घटना काहीही असु शकते. एखाद्याने आपला केलेला विश्वासघात असु शकतो, प्रेमभंग असु शकतो किंवा एखादी दुर्घटना असु शकते. जी आठवल्यावर आपल्याला वेदना होत असतात.
2) एखाद्या परिस्थितीचे ओझे डोक्यावर असणे:
खुप जण असतात ज्यांच्या डोक्यावर वेगवेगळया प्रकारचा ताण असतो. घरच्या आर्थिक परिस्थितीचा भार, करिअरचे टेंशन, पैसाची चणचण अशी अनेक कारणे देखील anxiety चे कारण बनत असतात.
3) आयुष्यात घडलेला एखादा नैराश्यवादी प्रसंगामुळे मनात नैराश्यवादी भावना निर्माण होणे:
आपल्या जीवणात भुतकाळात अशी काहीतरी नैराश्यवादी घटना घडलेली असते. ज्यामुळे आपल्याला वाटु लागते की आयुष्यात आत्ता सर्व काही संपले आहे, आता आयुष्यात काहीच राहिलेले नाहीये, आयुष्यात करण्यासारखे काही उरलेच नाहीये अशी नैराश्यवादी भावना मनात निर्माण झाल्यामुळे देखील anxiety होत असते.
4) आत्म प्रतिष्ठा संपुष्टात येणे:
आयुष्यामध्ये असे काही प्रसंग आपल्यासोबत घडत असतात. ज्यामुळे आपल्या आयुष्यात असलेला स्वतःचा आत्मविश्वास उडुन जात असतो. आपल्या मनात स्वतःविषयी असणारी आत्मसन्माची भावना देखील संपुष्टात येत असते. ज्यामुळे आपल्या मनात anxiety निर्माण होत असते.
Anxiety ची लक्षणे किती आणि कोणकोणती असतात?
1) नेहमी चिंतेत राहणे:
Anxiety चे पहिले लक्षण आहे नेहमी सतत चिंतेत राहणे.छोटछोटया गोष्टींवर चिंता करत बसणे हे anxiety चे लक्षण आहे.
2) एकाग्रतेमध्ये कमतरता जाणवणे:
Anxiety चे अजुन एक लक्षण म्हणजे एखादी गोष्ट करत असताना एकाग्रतेची कमतरता सतत जाणवणे मग ते वाचन असो किंवा इतर कोणतीही गोष्ट असो.
3) भीती वाटणे अस्वस्थ वाटणे:
सतत कोणत्याही गोष्टीवर भीती वाटणे तसेच नेहमी अस्वस्थ जाणवणे हे सुदधा anxiety चे लक्षण आहे.
4) नकारात्मक विचार मनात येत राहणे आणि ते बंदच न होणे:
सतत नकारात्मक विचारांची वर्दळ मनामध्ये चालत राहणे आणि मनात येणारे नकारात्मक विचार थांबतच नसणे हे सुदधा anxiety चे लक्षण आहे.
Anxiety वर करावयाची तपासणी आणि उपचार कोणकोणते? – Anxiety symptoms and treatment
1) सायकोथेरपीचा वापर करणे:
Anxiety दुर करण्यासाठी आपण सायकोथेरपीचा देखील चांगला उत्तम पदधतीने वापर करू शकतो. सायकोथेरपीमुळे आपली anxiety देखील दुर होण्यास मदत होत असते. ह्या थेरपीमध्ये कोणत्याही रूग्णाला मनावर नियंत्रण करायला शिकविले जात असते.
2) अशा रुग्णाला एकटे सोडु नये:
जर समजा आपल्या कुटुंबातील असो किंवा आपला एखादा परिचित व्यक्ती असो तो जर anxiety ने सतत त्रस्त राहत असेल तर आपण जास्तीत जास्त वेळ त्याच्यासोबत घालविण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण अशा रुग्णाला जास्तवेळ एकटे सोडणे हे योग्य नसते.
3) स्वस्थ आहाराचे नियमित सेवन करणे:
अशा व्यक्तीने भरपुर ताजी फळे, हिरव्या भाज्यांचा आहार सेवन करायला हवा. याचसोबत निश्चित वेळेवर देखील जेवण करणे गरजेचे असते. याचबरोबर बाहेरचे तळलेले उघड्यावरचे अन्न खाणे देखील अशा व्यक्तीने टाळायला हवे.
4) जेवणाची एक निश्चित वेळ ठरविणे:
आपल्याला जर कधीही आणि केव्हाही जेवण करायची सवय जर जडलेली असेल तर आपण ती लवकरात लवकर सोडायला हवी. कारण वेळीअवेळी कधीही जेवण केल्याने आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणून जेवणाची एक निश्चित वेळ असणे फार आवश्यक आहे.
5) सुमधुर संगीत ऐकावे:
संगीत ही एक अशी गोष्ट आहे जी आपला तणाव कमी करण्याचे काम करत असते. म्हणुन आपल्याला कधीही तणाव जाणवु लागला तर आपण सुमधूर संगीत ऐकायला हवे याने मन शांत आणि प्रफुल्लित होत असते.
6) नियमित व्यायाम करावा :
रोज कमीत कमी 20 ते 25 मिनिटे रोज व्यायाम करायला हवा.संध्याकाळी मोकळया वातावरणात फिरायला जावे.आणि रोज योगा तसेच ध्यान देखील करावे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Health Title: Anxiety symptoms and treatment in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार