22 November 2024 4:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

12 आमदारांची नियुक्तीनंतर भाजप पक्ष फुटण्याच्या भीतीने राजभवनाचं रुपांतर भाजप कार्यालयात - नाना पटोले

Devendra Fadnavis

मुंबई, २७ ऑगस्ट | राज्यपालांनी विधानपरिषेदत महाविकासआघाडीच्या 12 आमदारांची नियुक्ती केली तर भाजपमधील अनेकजण पक्षातून बाहेर पडतील, अशी भीती आहे. भाजप पक्ष सध्या या फुटीच्या उंबरठ्यावर असल्यामुळेच राजभवनाचं रुपांतर भाजप कार्यालयात करण्यात आल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलत असताना त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही 12 आमदारांच्या नियुक्तीत टाळाटाळ करत असल्याचा आरोपही केला.

12 आमदारांची नियुक्तीनंतर भाजप पक्ष फुटण्याच्या भीतीने राजभवनाचं रुपांतर भाजप कार्यालयात – Congress state president Nana Patole criticized governor Bhagat Singh Koshyari over 12 MLA delay politics :

यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही 12 आमदारांच्या नियुक्तीत टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे माननीय राज्यपालांना भेटायला बारा आमदारांच्या नियुक्ती बाबत चर्चा करण्यासाठी जाणार होते. राज्यपालांच्या ऑफिसमधून सांगण्यात आलं होतं की. आम्ही वेळ देतो. मात्र, ती वेळ देण्यात आली नाही.

आता साडेपाच वाजता मुख्यमंत्र्यांचे सचिव पत्र घेऊन आता गेले आहेत. हायकोर्टाच्या निकालानुसार राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढावा, असे आदेश दिले होते. मात्र, त्याचे पालन न करता राज्यपाल दिल्लीला गेले तिथे जाऊन ते कोणाला भेटले हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. 12 आमदारांची नियुक्ती होऊ नये यासाठी हा प्रयत्न असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.

12 आमदारांच्या नियुक्तीसाठी टाळाटाळ का?
भारतीय जनता पक्ष सध्या फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. राज्यपालांचा उपयोग जास्तीत जास्त भाजपाकडून केला जात आहे. राजभवन आता भाजपचे कार्यालय झाले आहे. भाजपने आयात केलेले अनेक नेते आणि आमदार आहेत. त्यांना असं वाटतं की आता आपण मंत्री होणार नाही. त्यामुळे तेही चिंतेत असून भाजपमध्ये फार चलबिचल सुरू झाली आहे. यापैकी अनेक नेते आणि आमदार माझ्या संपर्कात आहेत. 12 आमदारांची नियुक्ती झाली तर पक्ष फुटेल अशी भीती भाजपला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress state president Nana Patole criticized governor Bhagat Singh Koshyari over 12 MLA delay politics.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x