22 November 2024 2:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

टीम नाना पटोले | पृथ्वीराज चव्हाण यांची शिस्तपालन समिती अध्यक्ष पदी वर्णी | अंर्तगत वाद सुरु

Prithviraj Chavan

मुंबई, २७ ऑगस्ट | काँग्रेसमध्ये नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवृत्ती होऊन सहा महिने उलटल्यानंतर त्यांना काल नवीन टीम मिळाली. टीम देखील सव्वाशे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भरभक्कम आहे. 18 उपाध्यक्ष 65 सरचिटणीस आणि बरीच काही पदे काँग्रेस श्रेष्ठींनी भरली आहेत. यामध्ये अर्थातच नव्या जुन्यांचा संगम म्हणत प्रदेश काँग्रेस मधल्या सर्व नेत्यांना सामावून घेण्यात आले आहे.

टीम नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांची शिस्तपालन समिती अध्यक्ष पदी वर्णी, अंर्तगत वाद सुरु – Maharashtra congress conflict over appointment of Prithviraj Chavan on disciplinary committee :

नव्या नेत्यांमध्ये जुन्या दिवंगत नेत्यांच्या मुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. यामध्ये दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार धीरज देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव सुशील शिवराज चाकूरकर यांचा समावेश आहे. प्रज्ञा सातव यांना प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून स्थान देण्यात आले आहे, तर धीरज देशमुख आणि सुशील चाकूरकर यांना सरचिटणीस नेमण्यात आले आहे.

पण यातली सगळ्यात वादग्रस्त नियुक्ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ठरली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे त्यावरून काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्यांमध्ये नाराजी आहे पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून बंडखोरी करणाऱ्या जी 23 गटातले नेते आहेत त्यामुळे ज्यांनी स्वतःलाच शिस्तभंग केला त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन खोचक ट्विट अनेकांनी केली आहेत.

शिवाय प्रदेश कार्यकारणी प्रदेश कार्यकारणीत नेत्यांच्याच मुलांची अधिक वर्णी लावल्याने पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते देखील दुखावले गेले आहेत. काँग्रेस महाराष्ट्रामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

अशा स्थितीत काँग्रेस पक्षात एकजूट दिसण्याऐवजी कार्यकारिणीतील नियुक्तीच्या निमित्ताने पक्षांमध्ये वेगवेगळे गट आता समोरासमोर उभे ठाकल्याची चिन्हे दिसत आहेत. जुन्याच काँग्रेस संस्कृतीनुसार हे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढताना दिसत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra congress conflict over appointment of Prithviraj Chavan on disciplinary committee.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x