22 November 2024 1:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

फॅमिली कट्टा | ही आहेत घटस्फोटाची मुख्य १० कारणे - नक्की वाचा

 Most Common Reasons for Divorce

मुंबई, २७ ऑगस्ट | घटस्फोट, तस बघितल्या गेलं तर भारत हा अश्या देशांपैकी एक देश आहे जिथे घटस्फोटांचे प्रमाण खूप कमी आहे. पण बदलत्या काळानुसार हे चित्र देखील बदलायला लागले आहे. गेल्या काही वर्षांत, घटस्फोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून आली.

ही आहेत घटस्फोटाची मुख्य १० कारणे – Most Common Reasons for Divorce in Marathi :

पण हे घटस्फोटांचे प्रमाण का वाढत आहेत, याकडे आपण लक्ष द्यायला हवे, आजकाल तर कुठल्याही लहान-सहन कारणांवरून लोकं घटस्फोट घ्यायला तयार होतात. मुळात लोकांनाच आता ती जबाबदारी नकोशी झाली आहे. पण हे सामाजिक दृष्ट्या घटक आहे. त्यामुळे घटस्फोटां मागील मुख्य कारणे जाणून घेणे गरजेचे आहे.

प्रामाणिक नसणे:
विश्वास आणि प्रामाणिकता हा कुठल्याही नात्याचा पाया असतो. जर नात्यात विश्वासच उरला नसेल तर ते नातं टिकू शकत नाही. अप्रामाणिकपणा हे घटस्फोटांचे सर्वात कॉमन कारण आहे.

कम्युनिकेशन गॅप:
संवाद साधने खूप गरजेचे असते, तुम्हाला एकमेकांचे विचार, भावना समजून घ्यायच्या असतील तर तुमच्यात नियमित संवाद असणे गरजेचे आहे. कधीकधी संवाद नसल्याने नात्यात दुरावा येतो आणि मग तेच घटस्फोटाचे कारण ठरते.

महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य:
आपली संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती आहे, जिथे पुरुष हाच कर्ताधर्ता असतो. पण आजच्या काळात ही परिस्थिती बदलत चालली असून आता केवळ पुरुषच नाही तर महिला देखील कमवायला लागल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायला लागल्या आहेत. पण जर तुमची पत्नी तुमच्यापेक्षा जास्त कमावती असेल तर आजही आपल्या देशातील पुरुषांना पटत नाही, हो काही पुरुष याला नक्कीच अपवाद असतील, पण महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य हे देखील घटस्फोटाचे एक महत्वाचे कारण आहे.

Causes of divorce in India :

जबाबदारी स्वीकारणे:
लग्न म्हणजेचं जबाबदारी, लाग्नासोबतच तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या येतात ज्या तुम्हाला स्वीकाराव्या लागतात. तुमच्या जोडीदाराच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सोबत सामोरे जाण्याची तुमची तयारी असली पाहिजे, त्याच्या चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीत तुम्ही तेवढे जबाबदार आहात हे समजणे आणि ते स्वीकारणे गरजेचे असते.

संमतीशिवाय केलेले लग्न:
लग्न ही दोन व्यक्तींच्या जीवनातील सर्वात सुंदर आणि महत्वाची गोष्ट आहे, यामुळे त्या दोघांचचेही जीवन थोड्याफार प्रमाणात का होईना पण बदलते. ज्यांना त्यांचा संसार सोबत थाटायचा आहे त्यांची त्यासाठी संमती असणे खूप आवश्यक असते. जर त्यांची संमतीच नसेल तर ते नातं फार काळ टिकून राहत नाही. कारण ते नात जबरदस्तीने जोडलेलं असत. अशी लग्न खूप लवकर तुटतात आणि जरी ती टिकली, तरी ते केवळ समाज आणि कुटुंबाच्या दडपणाखाली जगात असतात.

लैंगिक संबंध:
सुखी वैवाहिक जीवनात सेक्सचा खूप मोठा वाटा असतो. जर तुमचे लैंगिक संबंध समाधानकारक असतील तर तुमचं नात जास्त काळ टिकून राहत, त्यामुळे नातं नेहेमी रिफ्रेश होत असत. पण जर तुमचा जोडीदार हा तुम्हाला समाधानकारक लैंगिक सुख देऊ शकत नसेल तर ते नात फार काळ टिकत नाही.

अपेक्षा:
आपल्या अपेक्षा नेहेमी पूर्ण व्हायलाच हव्यात असे नाही. पण नेहेमी असे बघितल्या गेले आहे की लग्नानंतर ज्याची अपेक्षा केली होती तसे झाले नाही आणि म्हणून देखील नातं तुटत. अपेक्षांची पूर्तता जर झाली नाही तर त्या त्या व्यक्तीच्या मनात असंतुष्टता राहते आणि त्यातून राग, चिडचिडेपणा उद्भवतो. पण यावर एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे अपेक्षा न ठेवणे. जेव्हा आपण कुठल्या गोष्टीची अपेक्षाच ठेवणार नाही तर ती पूर्ण नाही झाली याचा त्रासही होणार नाही.

सासू-सुनेची भांडण:
भारतात लग्न हे भलेही दोन व्यक्तींचं होत असल तरी त्यामुळे दोन कुटुंब जुळतात. त्यामुळे मुलीला सासरी गेल्यावर तिच्या सासरच्या मंडळींसोबत देखील जुळवून घ्यावं लागते. सासू-सुनेची भांडणं आपल्याकडे काही नवीन नाही पण कधी-कधी जर ही भांडणे विकोपाला गेली तर ते देखील घटस्फोटाचे कारण ठरू शकते.

मुलीच्या संसारात माहेरच्यांचा हस्तक्षेप:
बरेचदा असे होते की, मुलगी सासरी गेली की तिच्या माहेरचे तिला प्रत्येक लहान-सहन गोष्ट विचारतात, त्यावर तिने सार्सच्या लोकांशी कसे वागावे हे सांगतात. अश्या वारंवार माहेरच्यांच्या हस्तक्षेपाने देखील मुलीचा संसार चुकीच्या मार्गावर जातो आणि मग शेवटी तो कोर्टाची पायरी ओलांडतो.

वेगळेपण:
हे मुख्यकरून प्रेम विवाहांत बघायला मिळतात. ज्यामध्ये धर्म, जात, संस्कृती, जीवनशैली इत्यादी गोष्टींत वेगळेपण आढळून येते यावेळी समजूतदारपणा दाखवत तिच्याशी जुळवून घेणे महत्वाचे असते. जर ते जमल तर संस्राची गाडी अगदी रुळावर आनंदाने चालते, नाही तर ते नातं टिकून राहण्याची शक्यता फार कमी असते. ही आणि अशी अनेक करणे आहेत जी घटस्फोटासाठी जबाबदार असतात. पण मुळात अशी वेळच न येऊ देणे यातच शहाणपण

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Most Common Reasons for Divorce in Marathi.

हॅशटॅग्स

#FamilyFirst(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x