25 April 2025 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर 4.05 टक्क्यांनी घसरला, आता महत्वाची अपडेट आली - NSE: NTPCGREEN IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATATECH Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये घसरगुंडी, यापूर्वी दिला 726% परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RTNPOWER Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल EPFO Money News | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो तुमची बेसिक सॅलरी किती? खात्यात इतकी रक्कम जमा होणार, अपडेट पहा
x

कोकणी लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला धक्का | मोदी सरकारकडून कोंकण रेल्वेचे खाजगीकरण ?

Konkan Railway Corporation Ltd Recruitment 2021

रत्नागिरी, २८ ऑगस्ट | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी परवाच 6 लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा उपक्रमाची घोषणा केली आहे या योजनेंतर्गत रेल्वे, ऊर्जा ते रस्त्यापर्यंत अनेक मूलभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रातील सरकारी संपत्तीचे मॉनेटायझेशन केले जाणार असल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रातील सरकारी संपत्ती खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असून नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाइन असे या उपक्रमाला नाव देण्यात आले आहे. एकदा गुंतवणूक केल्यानंतर संबंधित प्रकल्प किंवा ती मालमत्ता खाजगी कंपनीकडे जाईल आणि त्या प्रकल्पांची पुनर्बांधणी किंवा विकास या दोन्ही गोष्टी संबंधित खाजगी कंपनीला करता येणार आहेत.

कोकणी लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला धक्का, मोदी सरकारकडून कोंकण रेल्वेचे खाजगीकरण ? – Privatization of Konkan Railway :

या उपक्रमांतर्गत देशातील अनेक विमानतळे, शेकडो किलमोटरचे रस्ते अनेक सरकारी इमारती त्याचबरोबर देशातील रेल्वे देखील खाजगी कंपनीच्या हातात जाणार आहे. यातच नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाइन उपक्रमात कोकण रेल्वेचा देखील समावेश करण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गाचा सुमारे 756 किलोमीटर अंतराचा मार्ग सरकार खाजगी कंपनीला हस्तांतरित करणार आहे, ज्यामधून सरकार 7281 कोटी रुपये उभा करणार आहे. कोकण रेल्वेतील 69 स्थानकांचा ताबा आता खाजगी कंपन्यांकडे जाणार आहे.

नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाइन या योजनेत रस्त्यांपाठोपाठ रेल्वे हे सर्वांत मोठे क्षेत्र असणार आहे. या NMP योजनेद्वारे 741 किलोमीटर लांबीची कोकण रेल्वे खाजगी कंपनीकडे देण्यात येणार आहे त्याशिवाय 400 रेल्वे स्टेशन,90 प्रवासी रेल्वेगाड्या, 15 रेल्वे स्टेडियम, निवडक रेल्वे कॉलनी, हे सारे रेल्वेचे प्रकल्प देशातील खाजगी कंपनीला देऊन मोदी सरकार येत्या 4 वर्षांमध्ये1.52 लाख कोटी रुपये कमाई करणार आहे.

जरी हे प्रकल्प खाजगी कंपन्यांना दिले तरी या मालमत्तांची मालकी सरकारकडेच राहील, मात्र त्यांना नफ्यात आणण्यासाठी त्या कंपन्या खाजगी क्षेत्रात दिल्या जातील. आणि नंतर त्या कंपन्या सरकारला परत देणार आहेत. नॅशनल मोनेटाइझेशन पाइपलाइन ही केंद्र सरकारची योजना आहे जी पुढील 4 वर्षांत सरकारी मालमत्तांमधून कमाई करेल. खाजगी क्षेत्र अशा अनेक पायाभूत सुविधा विकसित करेल आणि त्यावर अनेक वर्षे कमाई करेल. ठराविक वेळेनंतर ते ही मालमत्ता सरकारला परत करतील.असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन पाणी सांगितले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Privatization of Konkan Railway news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या