22 November 2024 2:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Alert | ISIS-K भारतापर्यंत पोहोचण्याची शक्यता | दक्षिण आशियात वाढू शकतात दहशतवादी कारवाया

ISIS

काबुल, २८ ऑगस्ट | अफगाणिस्तानावर तालिबान्यांनी ताबा मिळवताच देशात दहशतवादी कारवाया वाढत आहेत. गुरुवारी अफगाणिस्तानाची राजधानी काबूलमधील फिदाईनमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या फिदाईन हल्ल्यात 170 लोक ठार झाले असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. या हल्ल्याची जबाबदारी ISIS-K (खोरासन ग्रुप) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या असून भारतावर ISIS-K चा धोका वाढला आहे. ही संघटना दक्षिण आशिया आणि नंतर भारतात पोहोचण्याचा प्रयत्न करू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. इसिस खोरासनला कट्टरपंथी इस्लामी राजवट लादण्याची इच्छा आहे.

ISIS-K भारतापर्यंत पोहोचण्याची शक्यता, दक्षिण आशियात वाढू शकतात दहशतवादी कारवाया – India on alert ISIS K hopes to export Jihad in India intelligence community on alert after Kabul blast :

जिहाद निर्यात करण्याचा कट:
ISIS-K ला IS-K म्हणजे इस्लामिक स्टेट खोरासन असेही म्हणतात. ही संघटना तालिबान आणि अल-कायदापेक्षाही धर्मांध मानली जाते. हा गट भारत देशात जिहादी मानसिकता वाढवू शकतो अशी भीती भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांना आहे. हा संघटन मध्य आशिया आणि नंतर भारतात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणांना त्यांच्या संघटनेशी जोडणे आणि नंतर दहशतवादी हल्ले करणे हा संघटनेचा हेतू आहे. कारण यापूर्वी केरळ आणि मुंबईतून अनेक तरुण इसीसमध्ये सामील झाले होते. त्यामुळे ही संघटना भारतात ही पसरु शकते अशी भीती अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळेच देशातील गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

कट्टरपंथी संघटना डोके वर काढू शकतात:
एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, जर या गटाने षडयंत्र रचले तर भारतातील काही कट्टरपंथी किंवा दहशतवादी संघटना पुन्हा डोके वर काढू शकतात. कारण हा दहशतवादी संघटन देशातील तरुणांना त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करू शकतो. अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीनंतर अनेक दहशतवादी संघटनांना नवीन बळ मिळाले आहे. भारतातील अनेक हल्ल्यांची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने सांभाळली आहे. त्यामुळे या संघटना पुन्हा एकदा देशात आपले डोके वर काढू शकतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: India on alert ISIS K hopes to export Jihad in India intelligence community on alert after Kabul blast.

हॅशटॅग्स

#ISIS(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x