भाजपचे उत्पन्न 50 टक्क्यांनी म्हणजे 3,623.28 कोटीने वाढले, पण तुमचे? | राहुल गांधींचा सामान्यांना प्रश्न
मुंबई, २८ ऑगस्ट | भाजपच्या वाढलेल्या संपत्तीवरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी भाजपवर शनिवारी जोरदार टीका केली आहे. भाजपची संपत्ती 50 टक्क्यांनी वाढली आहे, तुमची किती? असे ट्विट करत राहुल यांनी भाजपवर निशाणा साधला. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या आकडेवारीनुसार 2019-20 मध्ये भाजपच्या संपत्तीत 3,623.28 कोटी रुपयांनी वाढली आहे.
भाजपचे उत्पन्न 50 टक्क्यांनी म्हणजे 3,623.28 कोटीने वाढले, तुमचे?, राहुल गांधींचा सामान्यांना प्रश्न – Rahul Gandhi slammed BJP over income rose by 50 percentage :
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालानुसार भाजपला मिळणाऱ्या इलेक्टोरल बाँडमध्ये वाढ झाल्याने पक्षाच्या संपत्तीत वाढ झाली आहे. एडीआरच्या रिपोर्टनुसार 2019-2020 मध्ये भाजपचे 3,623.28 कोटी रुपयांचे उत्पन्न होते. तर खर्च सुमारे 1,651.022 कोटी रुपये होता. काँग्रेसचे 682.21 कोटी रुपये उत्पन्न होते. तर खर्च हा सुमारे 998.158 कोटी रुपये होता. काँग्रेसचा उत्पन्नाच्या तुलनेत जादा खर्च होता.
BJP’s income rose by 50%.
And yours?BJP की आय 50% बढ़ गयी।
और आपकी? pic.twitter.com/Q5HEISACDJ— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 28, 2021
काय आहे इलेक्टोरल बाँड ?
राजकीय पक्षांना थेट देणगीतून पैसे मिळविण्यासाठी निवडणूक रोख्यांचा (इलेक्टोरल बाँड) पर्याय असतो. यामध्ये पारदर्शकता नसल्याचा विरोधी पक्षांकडून आरोप करण्यात येतो. असे असले तरी भारत निवडणूक आयोगाने काही अटींच्या अधीन राहून निवडणूक रोख्यांना परवानगी दिली आहे. या रोख्यांबाबत राजकीय पक्षांनी कार्यक्रमात अथवा जाहीर कार्यक्रमात किंवा माध्यमांमध्ये जाहीर उल्लेख करू नये, असे बंधन घालण्यात आल्याचे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.
भाजपच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालानुसार पक्षाला 2017-18 च्या तुलनेत 2019-20 मध्ये इलेक्टोरल बाँडमधून स्वच्छेने मिळणाऱ्या देणग्यांचे प्रमाण 21 टक्क्यांनी वाढले आहे. 2017-18 मध्ये 989 कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बाँडपैकी 210 कोटी रुपये हे स्वच्छेने मिळाले आहे. तर हे 2019-20 मध्ये भाजपला एकूण 2,555 कोटी रुपये हे इलेक्टोरल बाँडच्या विक्रीतून मिळाले आहे. त्यामधील 3,427 कोटी रुपये हे स्वच्छेने दिलेल्या देणगीतून मिळालेले आहेत.
इलेक्टोरल बाँडच्या विक्रीत काँग्रेसची परिस्थिती भाजपच्या उलट आहे. काँग्रेसला इलेक्टोरल बाँडच्या विक्रीतून मिळणाऱ्या देणग्यांचे प्रमाण हे 2019-20 मध्ये 2018-19 च्या तुलनेत 25 टक्क्यांनी कमी आहे. काँग्रेसला 2018-19 मध्ये 998 कोटी रुपये बाँड विक्रीतून मिळाले आहेत. तर 2019-20 मध्ये काँग्रेसला बाँड विक्रीतून 682 कोटी रुपये मिळाले आहेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Rahul Gandhi slammed BJP over income rose by 50 percentage news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS