21 November 2024 11:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भारताची तालिबानबरोबर चर्चा | कतारमध्ये घेतली भेट

Taliban in Afghanistan

नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट | अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळविल्यानंतर भारताने प्रथमच या संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. दोहा येथे भारताच्या राजदूतांनी तालिबान नेत्यांची भेट घेतली असून अफगाणिस्तानच्या हद्दीतून दहशतवाद्यांना दिल्या जात असलेल्या शरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतीय राजदूतांनी कतारची राजधानी दोहा येथे तालिबान नेत्याशी चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या नवीन राज्यकर्त्यांच्या विनंतीवरुन ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

भारताची तालिबानबरोबर चर्चा, कतारमध्ये घेतली भेट – Indian external affairs delegations held talks with the Taliban :

कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टेनकझई यांची भेट घेतली. निवेदनानुसार ही बैठक दोहा येथील भारतीय दूतावासात झाली. या दरम्यान, अफगाणिस्तान प्रदेशातून दहशतवाद्यांच्या शरणाबद्दल यावेळी भारताकडून चिंता व्यक्त करण्यात आली. स्टेनेकझाई यांनी आश्वासन दिले की, भारताकडून व्यक्त केलेल्या चिंतेचा विचार करण्यात येईल.

निवेदनात असेही म्हटले आहे की, ‘अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आणि जलद परतण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. अफगाणिस्तानच्या नागरिकांचा, विशेषत: अल्पसंख्यांकांचा, ज्यांना भारतात यायचे आहे, त्यांचा मुद्दाही चर्चेदरम्यान उपस्थित झाला. माहितीनुसार, राजदूत दीपक मित्तल म्हणाले की, अफगाणिस्तानची भूमी कोणत्याही प्रकारे भारतविरोधी कारवाया आणि दहशतवादासाठी वापरली जाऊ नये.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Indian external affairs delegations held talks with the Taliban.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x