22 November 2024 1:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

1 नोव्हेंबरपासून 43 स्मार्टफोन्समध्ये चालणार नाही WhatsApp | तुमचा फोन कोणता?

Whatsapp

मुंबई, ०६ सप्टेंबर | आपण सगळेच संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहून आपण व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एकमेकांशी संपर्क साधू शकतो. व्हॉट्सअ‍ॅप आज जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे. तरुण असो की वृद्ध, प्रत्येकजण व्हॉट्सअ‍ॅप वापरतो. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱयांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून व्हॉट्सअ‍ॅप 43 स्मार्टफोन मॉडेल्सवर चालणार नाही.

1 नोव्हेंबरपासून 43 स्मार्टफोन्समध्ये चालणार नाही WhatsApp, तुमचा फोन कोणता? – Whatsapp to stop working on 43 smartphone models from November :

व्हॉट्सअ‍ॅपने यावर्षी अनेक नवीन फीचर्स अ‍ॅपमध्ये जोडले आहेत. अ‍ॅप सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने जुन्या स्मार्टफोन्सचा निरोप घेण्याचे ठरवले आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. त्यामुळे तुमचा फोन जर या 43 फोनच्या यादीत असेल, तर नवा फोन घेणे योग्य ठरेल. कारण, एकदा का व्हॉट्सअ‍ॅपने सपोर्ट बंद केला तर तुमची चॅट हिस्ट्री देखील तुम्हाला वापरता येणार नाही.

या फोनवर व्हॉट्सअॅप चालेल:
* अँड्रॉइड ओएस 4.1 आणि त्यानंतरचे स्मार्टफोन्स
* iOS 10 आणि त्यानंतरचे आयफोन्स
* काही निवडक KaiOS 2.5.1 आणि त्यानंतरचे स्मार्टफोन्स, ज्यात JioPhone आणि JioPhone 2 चा समावेश आहे.

व्हॉट्सअ‍ॅप या स्मार्टफोनला सपोर्ट करणार नाही:
१ नोव्हेंबरपासून अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मच्या काही जुन्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही.

अॅपल:
आयफोनच्या एसई, 6s आणि 6s प्लसवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.

सॅमसंग:
सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाइट, गॅलेक्सी ट्रेंड II, गॅलेक्सी एस 2, गॅलेक्सी एस 3 मिनी, गॅलेक्सी एक्सकव्हर 2, गॅलेक्सी कोर आणि गॅलेक्सी एस 2वरही व्हॉट्सअ‍ॅप काम करणं बंद करेल.

सोनी:
सोनी एक्सपीरिया मायरो, सोनी एक्सपीरिया नियो एल आणि सोनी एक्सपीरिया आर्क एस.

हुआवेई:
हुआवेई असेंड जी740, असेंड मेट, हुआवेई असेंड डी क्वॉड एक्सएल, असेंड पी1 एस आणि असेंड डी2.

जेडटीई:
जेडटीई ग्रँड एस फ्लेक्स, जेडटीई व्ही956, ग्रँड एक्स क्वॉड व्ही986, ग्रँड मेमो.

इतर:
अल्काटेल वन टच इव्हो 7 हँड-ऑन, अर्कोस 53 प्लॅटिनम, एचटीसी Desire 500, Caterpillar कॅट बी 15, विको सिंक फाइव्ह, विको डार्कनाइट, लेनोवो ए820, यूएमआय एक्स 2, Faea एफ 1 आणि टीएचएल डब्ल्यू 8.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Whatsapp to stop working on 43 smartphone models from November.

हॅशटॅग्स

#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x