21 November 2024 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News
x

नागपूरमध्ये आली कोरोनाची तिसरी लाट | नवीन नियमावली जाहीर

Corona Pandemic

नागपूर, ०६ सप्टेंबर | कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा सुरू करण्यात आला आहे. पण, आता ज्याची भिती व्यक्त केली जात होती, ती कोरोनाची तिसरी लाट नागपूरमध्ये पाऊल टाकले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे नागपूरमध्ये पुन्हा विकेंड लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.

नागपूरमध्ये आली कोरोनाची तिसरी लाट, नवीन नियमावली जाहीर – Nagpur corona third wave new guidelines released said minister Nitin Raut :

नागपूरमध्ये पुन्हा तीन दिवसानंतर निर्बंध कडक करण्यात येणार आहे. नवीन निर्बंधानुसार, रेस्त्रारंट हे 8 वाजेपर्यंत सुरू असेल तर दुकानं 4 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. सोबतच परत एकदा विकेंडला बाजरापेठेसाठी लॉकडाऊन सुरू करण्यात येणार आहे. सर्व संघटना सोबत चर्चा करून तीन दिवसांनंतर हे नियम लागू करण्यात येणार आहे.

कोरोना संदर्भात जे आकडे समोर येत आहेत ते पाहता पुन्हा कडक निर्बंध लावण्याची गरज निर्माण झाली आहे. तिसऱ्या लाटेने नागपूर जिल्ह्यात पाऊल टाकले आहे. 78 बाधितांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहे, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. तिसऱ्या लाटेने जिल्ह्यात पदार्पण केले असल्याने हे निर्बंध लावावे लागणार आहे. येत्या दोन ते तीन दिवस चर्चा केल्यानंतर हे निर्बंध अमलात येतील, असंही राऊत यांनी सांगितलं.

असे असतील निर्बंध:

* हॉटेल रात्री 10 ऐवजी रात्री 8 वाजेपर्यंत
* दुकानं रात्री 10 ऐवजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत
* बाजार weekend ( शनिवार व रविवारी ) ला बंद

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Nagpur corona third wave new guidelines released said minister Nitin Raut.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x