22 November 2024 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ED प्रकरण | राज्यपाल नियुक्त आमदारकीला आढकाठी होण्याची शक्यता?

Eknath Khadse

जळगाव, ०७ सप्टेंबर | राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या 12 आमदारांचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या विषयावरून राज्याचे राजकीय वर्तुळ चांगलेच ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे सध्या याच विषयामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. भाजपमधून ते नुकतेच राष्ट्रवादीमध्ये आले आहेत. त्यानंतर त्यांचे राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादीकडून नाव देण्यात आले आहे. विधानपरिषदेमार्गे त्यांना आमदार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत खडसेंचे नाव दिले आहे.

ED प्रकरण, राज्यपाल नियुक्त आमदारकीला आढकाठी होण्याची शक्यता? – Eknath Khadse in trouble again after Bhosari case ED investigation :

मात्र, अलीकडे भोसरीतील भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने त्यांची काही मालमत्ता जप्त केले आहे. त्यामुळे खडसे जास्त चर्चेत आले आहेत. तसेच, यापूर्वीही खडसेंना याच गैरव्यवहार प्रकरणामुळे 12 खात्यांच्या मंत्रीपदावर पाणी सोडावे लागले होते. आता आमदारकी दृष्टिक्षेपात असताना पुन्हा याच भोसरी प्रकरणामुळे विघ्न येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ईडीकडून सुरू असलेली चौकशी पाहता, खडसेंच्या नावावर राज्यपाल फुली मारण्याची शक्यता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खडसेंचे राजकीय भवितव्य पुन्हा एकदा टांगणीला लागले आहे.

पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून एकनाथ खडसे यांनी साधारणपणे वर्षभरापूर्वी म्हणजेच, ऑक्टोबर 2020 मध्ये भाजपला ‘राम-राम ठोकला’ त्यांनी काही दिवसानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी खडसेंच्या राजकीय पुनर्वसनाबाबत राजकीय क्षेत्रात अनेक आडाखे बांधले गेले. एकनाथ खडसेंना विधानपरिषदेमार्गे आमदार करून पुढे त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल, हा त्यातलाच एक अंदाज होता. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत सहकार क्षेत्रातून खडसेंच्या नावाचा समावेश करून, त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेतही दिले. पण राज्यपालांनी अद्यापही राज्य सरकारने दिलेल्या यादीवर आपला निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे खडसेंच्या बाबतीत उत्सुकता कायम आहे.

एकनाथ खडसे यांच्या आमदारकीचा निर्णय सर्वस्वी राज्यपालांच्या मतावर अवलंबून आहे. सध्या भोसरी प्रकरणात खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे खडसेंच्या नावाला राज्यपालांनी हिरवा कंदील दिला तरी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले जाईल, यात शंका नाही. आधीच राज्य सरकार सचिन वाझे, 100 कोटींची वसुली अशा प्रकरणांनी हैराण आहे. यातून कसेबसे सावरणारे सरकार आता ताक ही फुंकून पिणार, हे निश्चित आहे. म्हणून खडसेंची वाट जरा बिकटच मानली जात आहे. खडसेंची ईडीकडून चौकशी सुरू असल्याने राज्यपालांकडून त्यांच्या नावाला कात्री लावली जाऊ शकते. दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार क्षेत्रातून त्यांचे नाव पुढे केले आहे.

परंतु, खडसेंची आजवर खरी ओळख ही राजकारणी म्हणून राहिली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातून त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यापूर्वी राज्यपाल कटाक्षाने निकष लावून त्यांची आमदारकी हाणून पाडू शकतात. एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली तर ते सभागृहात आक्रमकपणे घेरतील, अशी भीती भाजपला आहेच; त्यामुळे खडसेंच्या वाटेत या ना त्या प्रकारे काटे पेरण्याचे काम करण्याची आयती संधी भाजप तरी कशी सोडेल?

खडसेंच्या मुलीला मिळणार संधी?
एकनाथ खडसे यांच्या नावाला येणाऱ्या अडचणी लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची कन्या ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त कोट्यातून संधी मिळेल, अशी एक चर्चा सुरू झाली आहे. (2019)मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहिणी खडसे यांना भाजपने मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. खडसेंऐवजी रोहिणी यांना संधी देऊन त्यांचे लॉंचिंग होऊ शकते. रोहिणी खडसे यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. यामुळे सहकार क्षेत्रातून त्यांचे नाव पुढे केले जाऊ शकते. परंतु, गेल्या आठवड्यात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या संदर्भात एक चर्चा सुरू होती. त्यात पराभूत उमेदवारांची नावे सरकारकडून वगळली जाऊ शकतात, असे बोलले जात होते. असे असेल तर रोहिणी खडसे यांचे नाव समोर येणारच नाही, असाही अंदाज आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Eknath Khadse in trouble again after Bhosari case ED investigation.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x